एक्स्प्लोर
लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात !
![लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात ! Shopclues Launches Low Cost Convertible Laptop At Rs 10999 लॅपटॉप अवघ्या 10,999 रुपयात !](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15203505/laptop-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'शॉपक्लूज'ने गुरुवारी 'पेंटा टी पॅड' लॅपटॉप लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या लॅपटॉपची किंमत अवघी 10,999 रुपये आहे.
हा लॅपटॉप टॅबलेटच्या रुपातही काम करू शकेल असं कंपनीने म्हटलं आहे.
ज्या लॅपटॉप युझर्सना हलका, स्वस्त, मल्टिटास्किंग डिव्हाईस हवा आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करून कंपनीने या लॅपटॉपची निर्मिती केली आहे.
या लॅपटॉपची स्क्रीन 10.1 इंच आहे. तर 1280×800 पिक्सल रिझॉल्यूशन असलेल्या या लॅपटॉपमध्ये विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तर यामध्ये इंटेल X5 प्रोसेसर आहे.
या लॅपटॉपची बॅटरी सलग 6-7 तास चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
याशिवाय यामध्ये 2GB रॅम, 32GB रोम असून याची मेमरी 256 GB पर्यंत वाढवता येते. या लॅपटॉपचा रियर (पुढील) कॅमेरा 5 मेगा पिक्सलचा आहे.
'पेंटा टी पॅड'चे फिचर्स
* स्क्रीन 10.1 इंच, 1280×800 पिक्सल रिझॉल्यूशन
* ऑपरेटिंग सिस्टिम - विंडोज 10
* इंटेल X5 प्रोसेसर
*बॅटरी बॅकअप 6-7 तास
*2GB रॅम, 32GB रोम, एक्स्पांडेबल मेमरी 256 GB
*रियर कॅमेरा 5 मेगा पिक्सल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)