एक्स्प्लोर

आता हॉटेलमध्ये रोबो बजावणार वेटरची भूमिका, नागपूरच्या हॉटेलमध्ये रोबो वेटरकडून सेवा

हातातल्या ट्रे मध्ये चमचमीत आणि चविष्ट खाद्य पदार्थ घेऊन येणारे हे रोबो पाहून तुम्ही टोकियो किंवा शांघायच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारख वाटत. नागपूरच्या इटर्निटी मॉल मध्ये राज्यातले पहिले "रोबो हॉटेल" सुरु करण्यात आले आहे. "रोबो टू पॉईंट जिरो" नावाने सुरु झालेला हे हॉटेल इथल्या तीन रोबो वेटर्समुळे सध्या नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहे.

नागपूर : टीव्हीवर आपण जपान, चीन आणि इतर प्रगत देशात रोबो अनेक मानवी कामे करताना पाहतो. त्यांच्या कामातील अचूकता आणि तत्परता पाहून अचंबित होतो. मात्र, हेच रोबो आता चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाऊ घालत आहे. नागपुरात राज्यातील पहिले रोबो हॉटेल सुरु झाले आहे. 'रोबो टू पॉईंट जिरो' असं या हॉटेलचं नाव आहे. हॉटेल सध्या त्यांच्या रोबोटिक वेटर्समुळे नागपूरकरांच्या पंसतीस उतरले आहे. हातातल्या ट्रे मध्ये चमचमीत आणि चविष्ट खाद्य पदार्थ घेऊन येणारे हे रोबो पाहून तुम्ही टोकियो किंवा शांघायच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारख वाटत. नागपूरच्या इटर्निटी मॉल मध्ये राज्यातले पहिले "रोबो हॉटेल" सुरु करण्यात आले आहे. "रोबो टू पॉईंट जिरो" नावाने सुरु झालेला हे हॉटेल इथल्या तीन रोबो वेटर्समुळे सध्या नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहे . रोबो हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अभिवादन करतात आणि त्यांच्या पर्यंत मेनू कार्ड पोहचवतात. एवढचं नाही तर ग्राहकाने एकदा ऑर्डर दिल्यावर किचनमधून ते खाद्य पदार्थ टेबलपर्यंत आणून देतात. त्यापुढचं काम म्हणजेच पदार्थ ताटात वाढण्याचे काम मात्र मानवी वेटर्स करतात. नागपुरातच काय तर भारतात कधीच अशी संकल्पना न पाहिल्याने ग्राहक या रोबोरुपी वेटर्स वर जाम खुश आहेत. हॉटेलमध्ये आलेले ग्राहक सुरुवातीला रोबोरुपी वेटर्स पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतात. नंतर मात्र या रोबो सोबत सेल्फी काढणे, त्यांचे व्हिडीओ बनवणे असे उपक्रम सुरु होतात. या रोबोला फिरण्यासाठी हॉटेलच्या फ्लोरवर एक मॅग्नेटिक पाथ / मार्ग ( रेल ) बनवण्यात आली आहे. त्यावर फिरत हे रोबो प्रत्येक टेबलापर्यंत पोहोचतात. मात्र, हे रोबो ग्राहकांसोबत अभिवादन आणि इतर काही मोजकेच वाक्ये बोलतात. त्यांनी ग्राहकांशी मनसोक्त संवाद साधावा अशी अपेक्षाही काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. हॉटेलचे मॅनेजर संदीप शेंडे यांच्या मते रोबो टू पॉईंट जिरो हॉटेल महाराष्ट्रातील पहिले रोबो हॉटेल आहे. जपान मधून हे रोबो नागपुरात आल्याच्या दिवसापासून त्यांनी नागपूरकरांच्या मनात घर केले आहे. हे रोबो आल्यानंतर ग्राहकांची संख्या एवढी वाढली आहे की हॉटेलमध्ये यांत्रिकीकरण झाल्यानंतरही एकही वेटर ची संख्या कमी करावी लागली नाही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासासह यांत्रिकीकरण वाढते. मात्र याच यांत्रिकीकरणामुळे रोजगार कमी होतात असा ही आरोप होतो. मात्र, नागपुरात या रोबोरूपी वेटर्समुळे सध्या तरी कोणाच्या ही रोजगारावर संकट आलेले नाही. उलट त्यांनी ग्राहकांची संख्या वाढवून नवे रोजगार निर्माणच केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget