एक्स्प्लोर
सप्टेंबरमध्ये नव्या आयफोनला टक्कर देण्यासाठी शाओमी आणि VIVO सज्ज
स्मार्टफोनप्रेमींसाठी सप्टेंबर महिना खास आहे. कारण, या महिन्यात एकापेक्षा एक भन्नाट फोन लाँच होणार आहेत, ज्यात आयफोनचाही समावेश आहे.
मुंबई : तुम्ही गॅजेटप्रेमी असाल तर सप्टेंबर महिना तुमच्यासाठी खास आहे. कारण, कॅलिफोर्नियातील क्यूपरटीनोमध्ये 12 सप्टेंबर रोजी अॅपल पार्कमध्ये स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये अॅपलचे नवे आयफोन लाँच होतील. फोनशिवाय आणखी काही गॅजेटही लाँच केले जाणार आहेत. या इव्हेंटमध्ये अॅपल वॉच 4, अॅपल एअर पॉवर आणि पॉड 2 यांचा समावेश आहे. कंपनीने अधिकृतपणे अद्याप काहीही सांगितलं नसलं तरी, सीईओ टीम कूक यांच्या हस्ते फोनचं लाँचिंग होण्याची शक्यता आहे.
शाओमीही यावेळी भारतात इव्हेंटचं आयोजन करणार आहे. जिथे रेडमी 6, रेडमी 6A आणि MI A2 लाईट या फोनबाबतचा सस्पेंस संपणार आहे. MI A2 लाईट हा फोन शाओमी रेडमी 6 प्रो म्हणून ब्रँडिंग केलं जात आहे. फोनमध्ये नॉच डिस्प्लेचीही सुविधा देण्यात आली आहे.
रेड मी 6 प्रो
या फोनमध्ये फरक फक्त एवढाच आहे, की यामध्ये गुगल स्टॉक अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आऊट ऑफ द बॉक्सचा वापर करण्यात आला आहे. रेडमी 6 प्रोमध्ये 5.84 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि तीन आणि चार जीबी रॅम व्हर्जन असतील. फोनमध्ये 12 आणि 5 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4,000mAh क्षमतेची बॅटरी आहे.
शाओमी रेडमी 6 चे फीचर्स
MIUI 10 अँड्रॉईड ओरियो
5.4 इंच आकाराची स्क्रीन
हिलीयो पी 22 प्रोसेसर
3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज
4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हर्जन
12 आणि 5 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप
पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
शाओमी रेडमी 6A चे फीचर्स
5.45 इंच आकाराची स्क्रीन
हिलीयो A22 प्रोसेसर
13 आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज
वीवोही टक्कर देणार
वीवोचा फोनही याच महिन्यात लाँच केला जाणार आहे. वीवोने सहा सप्टेंबरला मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये वीवो व्ही 11 प्रो भारतीय बाजारात लाँच केला जाईल. ऑफिशिअल टीझरनुसार, वी 11 प्रो मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सुविधा देण्यात आली आहे. शिवाय डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर आणि ग्रेडियंट डिझाईन देण्यात आली आहे.
वी 11 प्रो मध्ये 6.41 इंच आकाराची फुल एचडी स्क्रीन, 660 प्रोसेसर, 6 जीबी रॅम, 12 आणि 5 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 25 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, तर या फोनमध्ये अँड्रॉईड ओरियो फन टच ओएस सिस्टम असेल.
रियलमी 2 प्रो
या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. याच महिन्यात 20 हजार रुपये किंमतीचा हा फोन लाँच केला जाईल.
संबंधित बातमी :
अॅपलचा सर्वात मोठा इव्हेंट जाहीर, आयफोनसह अनेक गॅजेट लाँच होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement