एक्स्प्लोर

SBI, HDFC, ICICI, येस, अॅक्सिसची 32 लाख ATM कार्ड करप्ट

मुंबई : एसबीआयच्या सहा लाखांहून जास्त डेबिट कार्डधारकांची कार्ड्स ब्लॉक केली असतानाच आता इतर बँकांच्या ग्राहकांची ई-सुरक्षाही धोक्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस आणि अॅक्सिस बँकेच्या सुमारे 32 लाख ग्राहकांची कार्ड्स करप्ट झाल्याची माहिती आहे. संबंधित बँकांच्या ग्राहकांना कार्ड रिप्लेस करण्याच्या किंवा सिक्युरिटी कोड (पिन नंबर) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे 32 लाख डेबिट कार्डधारकांची सुरक्षा धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमधल्या काही ठिकाणांहून आपल्या बँक खात्यात व्यवहार झाल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यानंतर तातडीने ही पावलं उचलण्यात येत आहेत. हिताची पेमेंट सर्व्हिसेसच्या सिस्टममधून मालवेअर आल्याने खासगी माहिती चोरुन फसवणूक होण्याची भीती आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

एचडीएफसी काय म्हणतं?

एचडीएफसी वगळता इतर एटीएममधून व्यवहार करणाऱ्या एचडीएफसीच्या ग्राहकांना पिन बदलण्याच्या सूचना काही आठवड्यांपूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फक्त एचडीएफसी बँकेच्याच एटीएममधून पैसे काढण्याचंही सुचवण्यात आलं आहे. इतर बँकांमधील एटीएमची ई-सुरक्षा तितकी चांगली नसल्याची शक्यता वर्तवत एचडीएफसीने या सूचना दिल्या आहेत.

SBI च्या 6 लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स पूर्वसूचनेविना ब्लॉक

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत बग शिरण्याच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बँकेतर्फे ही पावलं उचलण्यात आली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठलीही पूर्वसूचना न देता कार्ड्स अचानक ब्लॉक झाल्यामुळे कार्डहोल्डर हैराण झाले. त्यानंतर बँकेकडून ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले. संबंधित ग्राहकांना नवीन डेबिट कार्ड्स दिली जातील. त्यासाठी आपापल्या ब्रँचमध्ये नव्या कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय बँकिंगच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कार्ड रिप्लेसमेंट मानली जात आहे.

SBI : ब्लॉक झालेलं ATM पुन्हा कसं सुरु करावं?

एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर एसबीआयकडून ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडून ग्राहकांना फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्मवर बँक खात्याशी संबंधित सर्व माहितीचा तपशील द्यावा लागेल. फॉर्म भरताना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशी कागदपत्रं जवळ असणं गरजेचं आहे.

बँकेकडून पासवर्ड बदलण्याचं आवाहन

एटीएमच्या गैरव्यवहारापासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांनी पासवर्ड बदलावे, असं आवाहन बँकेकडून करण्यात आलं आहे. कुणाचा पासवर्ड किंवा कसलीही माहिती हॅक झाली असल्यास पासवर्ड बदलल्यामुळे गैरव्यवहार रोखता येऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget