एक्स्प्लोर

काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील.

मुंबई : sarahah या अॅपच्या लिंक्स सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार दिसत आहेत. यावरुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट सांगू शकता, मात्र तुमची ओळख गोपनीय राहील. तुमच्या मनात एखाद्याविषयी असलेलं प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचवू शकाल. आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे या अॅपवर अनेकांच्या उड्या पडत आहेत. 'साराहाह'ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता. Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल? गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी, तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा. तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे. संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे. Sarahah चे साइड-इफेक्ट काय आहेत? मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget