एक्स्प्लोर
जगभरातून 25 लाख सॅमसंग गॅलक्सी नोट 7 कंपनीने मागवले परत

मुंबई : जर तुम्ही किंवा तुमच्या परिचितांपैकी कोणी 'सॅमसंग गॅलक्सी नोट 7' हा स्मार्टफोन वापरत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सॅमसंग कंपनीने जगभरातून त्यांचे 'गॅलक्सी नोट 7' हे मोबाईल फोन परत मागवले आहेत. चार्जिंग करताना बॅटऱ्यांचा स्फोट होत असल्यामुळे कंपनीनं हे सर्व फोन परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन 'गॅलक्सी नोट 7' ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. फोनच्या निर्मितीदरम्यान झालेली चूक दुरुस्त होण्यास 2 आठवड्यांचा कालावधी लागेल, त्यानंतर वितरकामार्फत नवीन फोन बाजारात आणले जातील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण कोरियाई न्यूज एजन्सी योनहॅपने अशा पाच घटना जगभरात घडल्याचं सांगितलं होतं, सॅमसंगने मात्र 35 केसेसची माहिती मिळाल्याचं स्पष्ट केलं.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















