एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलेक्सी नोट 7चा स्फोट, गाडीचीही राख

फ्लोरिडा : चार्जिंग करताना सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 चा स्फोट झाल्याने एका व्यक्तीच्या जीपला आग लागली. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये सोमवारी ही घडली. नॅथन डॉर्नेचर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. नॅथनच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट 7 हा स्मार्टफोन त्याने जीपमध्ये चार्जिंगला लावला होता. मात्र त्याचवेळी फोनचा स्फोट झाला. या घटनेत गाडीलाही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावं लागलं. या घटनेत फोन आणि गाडीच्या आतील भागाची अक्षरश: राख झाली. जगभरातून 25 लाख सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 कंपनीने परत मागवले चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट होत असल्यामुळे गॅलेक्सी नोट 7 परत मागवत असल्याचं कंपनीने सांगितल्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली. नॅथनही या घटनेची माहिती, तसंच फोन आणि गाडीचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण





















