एक्स्प्लोर
आय स्कॅनर, 4GB रॅम, गॅलक्सी नोट सीरीजचा नवा फोन लाँच
नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 हा मच अवेटेड स्मार्टफोन लाँच केला आहे. गॅलक्सीचा हा सर्वात स्टायलिश स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी गॅलक्सी नोट 5 हा फोन लाँच करण्यात आला होता. मात्र या फोनला नोट 6 नाव न देता नोट 7 नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये आय स्कॅनर असून डोळ्यांनी फोन उचलता येणार आहे.
गॅलक्सी नोट 7 मध्ये नोट 5 आणि s7 एज या फोनमधील अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. नोट 7 चार देशांमध्ये 19 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. चीनमध्ये या फोनची आजपासून प्री ऑर्डर घेतली जाणार आहे. चीनमध्ये या फोनची किंमत जवळपास 35 हजार रुपये असणार आहे. भारतात हा फोन 11 ऑगस्टला येईल, असा अंदाज लावला जात आहे.
काय आहेत फीचर्स?
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- स्नॅपड्रॅगन 820 चीप क्वालकॉम प्रोसेसर
- 4 GB रॅम
- 64 GB स्टोरेज
- 12/5 मेगापिक्सेल कॅमेरा
- आय स्कॅनर
- 3500mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement