एक्स्प्लोर
Advertisement
सॅमसंगचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A8 (2016) लवकरच बाजारात
नवी दिल्ली: सॅमसंग आपल्या नव्या A सीरीजला पुढे वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला नवा A8 (2016) हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या नव्या फ्लॅगशिपला गीकबेंच लिस्टिंगमध्ये नुकतेच स्पॉट करण्यात आले आहे. या लिस्टिंगमध्ये फोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले आहेत.
लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनला SM-A810F हा क्रमांक असा क्रमांक देण्यात आला असून, हा फोन अॅन्ड्रॉइडच्या नव्या 6.0.1 मार्शमॅलोपर चालेल. यामध्ये 1.5GHz ऑक्टोकोर Exynos 7420 प्रोसेसर आणि 3GB रॅम असेल. या स्मार्टफोनची किंमत अप्पर-मिड रेंजमध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी या फोनला GFX बेंचवरूनही हा स्मार्टफोन स्पॉट करण्यात आला होता. GFX ने दिलेल्या फिचर्समध्ये या स्मार्टफोनमध्ये 5.1 इंचाची स्क्रिन, 32GB इंटरनल स्टोअरेज आणि 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असेल. कंपनीच्या A सीरीजमधील स्मार्टफोनमध्ये OIS( ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन) फिचर देण्यात आले आहेत. या नव्या स्मार्टफोनमध्येही हे फिचर असण्याची शक्यता आहे.
हा स्मार्टफोन कधी लाँच करणार, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी गीकबेंच आणि GFX बेंचच्या लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement