एक्स्प्लोर
Advertisement
3 जीबी रॅम आणि दमदार बॅटरीसह सॅमसंगचे 3 स्मार्टफोन लॉन्च
मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपले तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी A3, A5 आणि A7 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सध्या हे स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसले तरीही लवकरच ते भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
सॅमसंगनं या तीनही स्मार्टफोनना प्रीमियम लूक देण्यासाठी मेटल फ्रेम आणि 3D ग्लासच आवरण दिलं आहे. अशाप्रकारचं आवरण मागच्या वर्षी बाजारात आलेल्या गॅलेक्सी S7 आणि S7 एजमध्ये देण्यात आलं होतं.
सॅमसंगचे हे तीनही स्मार्टफोन ब्लॅक स्काय, गोल्ड सँड आणि पीच क्लाउड या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील.
सॅमसंग गॅलेक्सी A3 (2017) चे फीचर्स
ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0
रॅम 2 जीबी
डिस्प्ले 4.7 इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले
प्रोसेसर 1.6 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
मेमरी 16 जीबी
बॅटरी 2350 mAh
कॅमेरा रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 8 मेगापिक्सेल
सॅमसंग गॅलेक्सी A (2017) चे फीचर्स
ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0
रॅम 3 जीबी
डिस्प्ले 5.2 इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले
प्रोसेसर 1.9 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
मेमरी 32 जीबी
बॅटरी 3000 mAh
कॅमेरा रिअर 16 मेगापिक्सेल आणि फ्रंट 8 मेगापिक्सेल
सॅमसंग गॅलेक्सी A7 (2017) चे फीचर्स
ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0
रॅम 3 जीबी
डिस्प्ले 5.5 इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले
प्रोसेसर 1.9 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
मेमरी 32 जीबी
बॅटरी 3300 mAh
कॅमेरा रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 5 मेगापिक्सेल
या तीनही स्मार्टफोनमध्ये NFC, ब्ल्यूटूथ, वायफाय, तसंच फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement