एक्स्प्लोर
रिंगिंग बेल्सची ऑफर, लॉयल्टी कार्डवर फ्रीडम 251 स्मार्टफोन मोफत!

मुंबई: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'फ्रीडम 251' स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्स आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट देणार आहे. या कंपनीनं मंगळवारी आपल्या वर्धापनदिनानिमित्त प्रोडक्टसाठी लॉयल्टी कार्ड कार्यक्रमाचा शुभारंभ केला. ग्राहकांना सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम लॉयल्टी कार्ड मिळणार आहे. या कार्डमुळे रिंगिंग बेल्सच्या उत्पादनाच्या खरेदीवर सूट मिळणार आहे. तसेच फ्रीडम 251 स्मार्टफोन देखील मोफत मिळणार आहे. कंपनीनं मंगळवारी जारी केलेल्या आपल्या पत्रकात म्हटलं आहे की, 'लॉयल्टी कार्ड हे एका वर्षासाठी वैध असणार आहे. ग्राहकांना 500 रुपये, 1000 रुपये आणि 2000 रुपयांच्या कार्डवर अनुक्रमे 5 टक्के, 10 टक्के आणि 15 टक्के खरेदीवर सूट मिळेल.' 'सिल्वर आणि गोल्ड कार्डसोबत एक फ्रीडम 251 स्मार्टफोन आणि प्लॅटिनम कार्डसोबत दोन 'फ्रीडम 251' मोफत दिले जातील.' असंही कंपनीनं जाहीर केलं आहे. कंपनीच्या वेबसाईटवर लॉयल्टी कार्डचं बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
भारत





















