एक्स्प्लोर

टेलिकॉमनंतर जिओ आता DTH क्षेत्रात सर्वात स्वस्त सेवा देणार?

मुंबई : रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रातील दरांचे सर्व समीकरणं मोडित काढल्यानंतर कंपनी आता डीटीएच क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर जिओच्या सेट टॉप बॉक्सची काही फोटो व्हायरल झाली आहेत. दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यानंतर डेटा दर आणि व्हॉईस कॉलिंग दर कमी करण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यानंतर आता डीटीएच क्षेत्रात रिलायन्सने पाऊल ठेवल्यानंतर अशीच स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. काय आहे व्हायरल मेसेज? रिलायन्स जिओच्या लोगोसह सेट टॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जिओच्या डीटीएच सेवेत 360 चॅनल्स असतील, त्यापैकी 50 चॅनल्स एचडी असतील, असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. डेटाप्रमाणेच जिओ डीटीएच सेवाही सर्वात स्वस्त दरात देणार असल्याची चर्चा आहे. 450 रुपये या सेट टॉप बॉक्सची किंमत असेल, पहिल्या सहा महिन्यांसाठी 360 चॅनेल्स मोफत पाहता येतील, त्यानंतर 360 चॅनल्ससाठी 120 रुपये प्रति महिना या दराने पैसे माजावे लागतील, असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. दरम्यान जिओने यापूर्वीही डीटीएच क्षेत्रात येण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे लवकरच जिओची ही सेवा मुंबईतून सुरु होऊ शकते, असं बोललं जात आहे. दूरसंचार क्षेत्रात जिओचा धुमाकूळ सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4G अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. यानुसार जिओच्या सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली. रिलायन्स जिओने मोफत डेटा सेवा लाँच केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. यामध्ये अनेक कंपन्यांनी कॉल आणि डेटा दर मोठ्या प्रमाणात कमी केले. जिओला पहिल्या सहा महिन्यातच 10 कोटी ग्राहक मिळवण्यात यश आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget