एक्स्प्लोर
जिओच्या 'या' रिचार्ज प्लानवर तब्बल 100 जीबी मोफत डेटा
मुंबई: रिलायन्स जिओ प्राइम ऑफर 15 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या यूजर्सनं प्राइम मेंबरशीप घेतली नव्हती. त्यांना ती घेता येणार आहे. याबरोबरच जिओनं आपल्या ग्राहकांसाठी समर सरप्राइज ऑफरही आणली आहे.
समर सरप्राइज ऑफरमध्ये 303 आणि 499 रुपयाचं एकदा रिचार्ज केल्यास तीन महिन्यापर्यंत सेवा मोफत मिळणार आहे. पण जर तुम्ही 999 रुपयांचं रिचार्ज केल्यास एक वेगळी ऑफर तुम्हाला मिळणार आहे.
जिओ प्राइम मेंबरनं 999 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर त्याला 60 दिवसांसाठी मोफत कॉलिंगसह 60 जीबी डेटा मिळतो. पण समर सरप्राइज ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना 3 महिन्यासाठी 100 जीबी डेटा देणार आहे. यामध्ये यूजर्स दिवसाला कोणात्याही लिमिटशिवाय 100 डेटा वापरु शकतो. हा डेटा 30 जूनपर्यंत उपलब्ध असणार आहे.
1,999 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांसाठी 125 जीबी डेटा मिळणार आहे. 999 आणि त्यापुढील सर्वच रिचार्ज प्लानमध्ये 90 दिवसांसाठी तब्बल 100 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. दरम्यान, सर्व रिचार्ज प्लान 1 जुलैपासून लागू होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement