एक्स्प्लोर

दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारं जिओचं एक वर्ष

जिओच्या सेवेनंतर डेटा दरांमध्ये कपात करण्याची दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. तर मोफत सेवा देऊन जिओने सर्वात वेगाने ग्राहक मिळवण्याचा विक्रमही केला.

मुंबई : रिलायन्सने जिओ 4G सेवा लाँच करुन आज एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षाच्या काळात भारतामध्ये 4G सेवेत क्रांतीकारी बदल दिसून आला. जिओच्या सेवेनंतर डेटा दरांमध्ये कपात करण्याची दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. तर मोफत सेवा देऊन जिओने सर्वात वेगाने ग्राहक मिळवण्याचा विक्रमही केला. जिओपूर्वी भारतात डेटाचा विचार एमबीमध्ये केला जायचा. मात्र आज जिओ युझर्स जीबीमध्ये डेटाचा विचार करतात. मोबाईल इंटरनेट डेटाच्या बाबतीत भारताचा जगात 155 वा क्रमांक होता. तर भारत आता सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. जिओ येण्यापूर्वी भारतात महिन्याला 20 कोटी GB डेटा वापरला जायचा. हा आकडा आता 150 कोटी GB झाला आहे. ज्यापैकी केवळ जिओचे ग्राहकच 125 कोटी GB डेटा वापरतात. जिओवर एका महिन्याला 165 कोटी तास व्हिडिओ स्ट्रिमिंग केली जाते. तर 250 कोटी मिनिट व्हॉईस कॉलिंगसाठी प्रती दिन वापरली जातात. VoLTE सेवा देणारी जिओ पहिलीच कंपनी ठरली. अजूनपर्यंत एकाही दूरसंचार कंपनीने ग्राहकांना ही सेवा दिलेली नाही. देशातील 75 टक्के लोकांकडे जिओ नेटवर्क असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या एका वर्षात 99 टक्के लोकांकडे जिओ असेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. जिओने सर्वात वेगाने ग्राहक जोडण्याचाही विक्रम केला. कंपनीने लाँचिंगनंतर 170 दिवसात प्रत्येक सेकंदाला 7 ग्राहक जोडून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप यांचाही विक्रम मोडला. मोफत जिओ फोन जिओने दूरसंचार कंपन्यांची झोप उडवल्यानंतर आता थेट मोफत 4G फीचर फोन देण्याची घोषणा केली. 15 ऑगस्ट रोजी हा फोन लाँच करण्यात आला. तर 24 ऑगस्ट रोजी या फोनसाठी प्री बुकिंग सुरु करण्यात आली. दरम्यान जास्त प्रतिसाद मिळाल्याने ही प्री बुकिंग दोन दिवसातच बंद करावी लागली. एका दिवसात 60 लाख ग्राहकांनी जिओ फोन बुक केला आहे. जिओ फोनची किंमत शून्य रुपये असली तरीही 1500 रुपये अनामत रक्कम म्हणून द्यावी लागणार आहे. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील. या फोनला महिन्याला 153 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. 4G फोनमध्ये झपाट्याने वाढ जिओ सिम वापरण्यासाठी 4G फोन असणं आवश्यक आहे. जिओने एका वर्षात 12 कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहेत. 2015 च्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोन बाजारात 3G फोनची भागीदारी 73 टक्के, 2G फोनची भागीदारी 23 टक्के होती. मात्र 2017 च्या पहिल्या तिमाहीत 95 टक्के लोकांकडे 4G फोन आहे. तर केवळ 5 टक्के लोकांकडे 3G आणि 2G फोन आहे. म्हणजेच 2017 मध्ये 4G ग्राहकांची संख्या तीन पटीने वाढली आहे. फायबर टू द होम डिजीटल इंडियासाठी जिओचा पुढचा मेगा प्लॅन FTTH म्हणजेच ‘फायबर टू द होम’ असणार आहे. मोबाईल डेटा क्षेत्रात जम बसवल्यानंतर घरगुती आणि कार्यालयीन इंटरनेटला वेग देण्यासाठी जिओची ही सेवा 100 Mbps स्पीडचं नेटवर्क देणार आहे. या ब्रॉडबँडच्या लाँचिंग प्लॅनमध्येही अनेक अशा ऑफर असू शकतात ज्या जुनं नेटवर्क सोडून जिओ घेण्यासाठी भाग पाडतील. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आयडिया आणि BSNL ब्रॉडबँड कनेक्शनचं जाळं आहे. मात्र यांचं स्पीड आणि डेटा दर पाहून जिओ ग्रामीण भागाच्या डिजीटल क्रांतीची नांदी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget