एक्स्प्लोर

जिओ मार्चनंतर आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत?

मुंबई : रिलायन्स जिओशी चार महिन्यात 7 कोटी 24 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. वेलकम ऑफरनंतर प्रतिदिन 6 लाख ग्राहक जोडल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा आकडा मार्चपर्यंत 10 कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असंही कंपनीने म्हटलं आहे. मार्च 2017 पर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ग्राहकांना पेड सेवा कधीपासून मिळेल, यावर कंपनीने अद्यापही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सकडून मार्चनंतरही मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा मोफत दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. रिलायन्सला रोज लाखो ग्राहक मिळत असून 31 डिसेंबरपर्यंतच ग्राहकांची संख्या 7 कोटी 24 लाख एवढी झाली आहे, असं रिलायन्स जिओचे रणनितीकार आणि योजना प्रमुख अंशुमान ठाकूर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी मोफत सेवा वाढवणार का, या प्रश्नावर मौन बाळगलं. जिओ टू एअरटेल केलेल्या एक हजार कॉलपैकी 175 कॉल ड्रॉप होतात, असा खुलासाही रिलायन्सने केला आहे. ट्रायच्या नियमानुसार एक हजारपैकी 5 पेक्षा अधिक कॉल ड्रॉप करता येत नाहीत. जिओची ब्रॉडबँड सेवा दरम्यान रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेतही पाऊल ठेवल्याची माहिती आहे. मुंबईतून या सेवेची सुरुवात करण्यात आली असून ऑफरनुसार ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा दिला जात आहे. लवकरच जिओचे स्वस्त फीचर फोन देशात 4G इंटरनेट सेवेत मोठा बदल घडवून आणल्यानंतर रिलायन्स जिओ आता स्वस्त दरात 4G फीचर फोनही उपलब्ध करुन देणार आहे. या 4G फोनची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी असेल, असं बोललं जात आहे. रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये वेलकम ऑफर आणत 4G इंटरनेट सेवेत एक मोठा बदल घडवून आणला. ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सेवा मिळणार होती. मात्र रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ऑफरला हॅप्पी न्यू ईयर नाव देत ही ऑफर 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget