एक्स्प्लोर

जिओ 4G च्या निमित्ताने अंबांनींच्या जुळ्या मुलांचं कॉर्पोरेट जगतात पाऊल

नवी दिल्ली: रिलायन्सने आज टेलिकॉम जगतात जिओ 4G च्या निमित्ताने महाक्रांती आणली आहे. मात्र त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या जुळ्या मुलांनाही कार्पोरेट जगतात लाँच केलं. मुकेश अंबानींनी 4G च्या निमित्ताने ईशा आणि आकाश या जुळ्या मुलांना कार्पोरेट जगतासमोर आणलं.   रिलायन्सच्या जिओ 4G साठी ईशा आणि आकाश यांनी मेहनत घेतल्याचं सांगण्यात येत आहे.  रिलायन्सच्या या मेगाप्रोजेक्टच्या मागे ईशा आणि आकाश आहेत. Isha Ambani, Akash Ambani जिओ 4G च्या लाँचिंगवेळी मुकेश अंबानी म्हणाले, "जिओ 4G हे तरुणांचं, तरुणांसाठी, तरुणांनी टाकलेलं पाऊल आहे. या टीमचं नेतृत्त्व ईशा आणि आकाश अंबानी करत आहेत".   ईशा आणि आकाश हे ऑक्टोबर 2014 मध्ये जिओ बोर्ड मेंबरचे सदस्य बनले होते. तेव्हापासून हे दोघे जिओ 4G साठी काम करत होते.   रिलायन्सच्या जिओ 4G साठी तब्बल 15 हजार कर्मचारी काम करत आहेत. रिलायन्स जिओ 4G हे लवकरच 90 टक्के इंटरनेट युझर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास अंबानींनी व्यक्त केला.   येल युनिव्हर्सिटीतून पदवी 25 वर्षीय ईशा आणि आकाश अंबानीचा जन्म 1991 मध्ये झाला. ईशाने तीचं पदवीचं शिक्षण 'साऊथ एशियन स्टडीज'मध्ये येल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केलं आहे. त्यानंतर पिता मुकेश अंबानींनी 2014 मध्ये ईशाला रिलायन्स जिओ 4G च्या बोर्ड मेंबरचं सदस्यपद दिलं. जिओ 4G च्या निमित्ताने अंबांनींच्या जुळ्या मुलांचं कॉर्पोरेट जगतात पाऊल आकाश अंबानीकडे इकॉनॉमिक्सची पदवी आकाश अंबानीनेही उच्च शिक्षण घेतलं आहे. आकाशने ब्राऊन युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र अर्थात इकॉनॉमिक्सची पदवी मिळवली आहे. त्यानंतर आकाशला मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल बोर्डचं सदस्यत्व दिलं.   रिलायन्स जिओच्या ऑफर्स : *19 रुपयांत एका दिवसाचं इंटरनेट (किती डेटा मिळणार याचा उल्लेख नाही) *999 रुपयात 10 GB डेटा – रात्री अनलिमिटेड 4G *1499 रुपयात 20 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *2499 रुपयात 35 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *3999 रुपयात 60 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G *4999 रुपयात 75 GB डेटा- रात्री अनलिमिटिड 4G   रिलायन्स जिओ 4G च्या प्लानवर एक नजर
  • 5 सप्टेंबर रोजी लाँचिंग
  • आयुष्यभरासाठी आऊटगोईंग कॉलिंग फ्री, STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री
  • डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ 50 रुपयात 1GB 4G डेटा
  • आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री
  • डेटाच्या दरात कॉलिंग फ्री, फक्त इंटरनेट डेटाचे पैसा भरावे लागणार
  • 18,000 शहरं आणि 2 लाख गांवांपर्यंत जिओची सुविधा
  • मार्च 2017 पर्यंत 90 टक्के जनतेपर्यंत जिओ पोहचवण्याचा मानस
  • विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के वाढीव डेटा
  • 30 हजार शाळांमध्ये मोफत वायफाय
  • जिओ जगातील सर्वात स्वस्त डेटा देणार
  • ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS, कॉल दर वाढणार नाही.
  • जिओवर टीव्ही, सिनेमा आणि मासिकं पाहण्याची सोय
  • 300 चॅनल लाइव्ह पाहण्याची सुविधा
  • 15 हजार रुपयांचं अॅप सब्स्क्रिप्शन अॅक्टिव्ह यूझर्ससाठी फ्री
  • 3 हजार रुपयात जिओ 4G मोबाइल फोन
  • आंतरराष्ट्रीय रोमिंग रेट सर्वात स्वस्त
  संबंधित बातम्याः रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget