एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बहुप्रतीक्षित ‘रेडमी नोट 5’ स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!
रेडमी नोट 5 मध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला असून, 1.25 मायक्रॉन पिक्सेलचं सेन्सरही देण्यात आले आहे. त्याचसोबत, 5 मेगापिक्सेलचा सॉफ्ट लाईट फ्लॅशसोबत फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : चिनी बाजारात लॉन्च झालेल्या ‘रेडमी नोट 5’ आता जगभरातील बाजारपेठेत दाखल होणार आहे. ‘रेडमी नोट 5’ गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. फेब्रुवारीत ग्लोबली लॉन्च केला जाणार आहे.
प्रसिद्ध टिपस्ट रोनॉल्ड क्वांड यांनी ट्विट करुन माहिती दिली की, शाओमी रेडमी नोट 5 फेब्रुवारीमध्ये जगभरातील बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जाईल.
2 जीबी रॅमच्या व्हेरिएंटमध्ये 16 जीबी स्टोरेजची सुविधा, तर 3 जीबी रॅमच्या व्हेरिएंटम 32 जीबी स्टोरेजची सुविधा असणार आहे. या दोन्हींची किंमत अनुक्रमे 7 हजार 800 रुपये आणि 8 हजार 800 रुपये असणार आहे.
रेडमी नोट 5 मध्ये 5.7 इंचाचा HD+ 18:9 डिस्प्ले असेल, ज्याचं रिझॉल्युशन 720x1440 पिक्सेल आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आले असून, 2 आणि3 जीबी रॅमचे व्हेरिएंट आहेत. एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.1
रेडमी नोट 5 मध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला असून, 1.25 मायक्रॉन पिक्सेलचं सेन्सरही देण्यात आले आहे. त्याचसोबत, 5 मेगापिक्सेलचा सॉफ्ट लाईट फ्लॅशसोबत फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
3300mAh क्षमतेची बॅटरी रेडमी नोट 5 मध्ये देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement