एक्स्प्लोर
राज ठाकरेंची आज फेसबुकवर एण्ट्री
आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत.

मुंबई: युवकांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे फेसबुकवर एण्ट्री करणार आहेत. त्यांच्या फेसबुक पेजचं आज अनावरण होणार आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे फेसबुकवर एण्ट्री घेत आहेत. यासाठी मनसेतर्फे एक चित्रफीतही तयार करण्यात आली आहे. तरुणांना मनसेकडं वळवण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे. “व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी रेखाटलेली व्यंगचित्र फेसबुकच्या माध्यमातून कुणा-कुणावर वार करतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आज दादरमध्ये खास कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत. https://twitter.com/mnsadhikrut/status/910166132199268352
Before You Go
Devendra Fadnavis With Farmer: देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?






















