एक्स्प्लोर
सॅमसंग दिवाळी धमाका, गॅलक्सी S8+ सह अनेक स्मार्टफोनवर सूट
दिवाळीनिमित्त या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या किंमती पुढेही कायम राहतील का? याबाबत अद्याप कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुंबई : सॅमसंगनं आपला खास स्मार्टफोन गॅलक्सी S8+च्या किंमतीत तब्बल 6,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त 58,900 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर मिडरेंज स्मार्टफोन गॅलक्सी A5 (2017) आणि गॅलक्सी A7 (2017) या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 4,900 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे A5 17,990 रु. तर A7 20,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. हे स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट किंवा ऑनलाइन रिटेलर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे. दिवाळीनिमित्त या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या किंमती पुढेही कायम राहतील का? याबाबत अद्याप कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
सॅमसंग गॅलक्सी S8मध्ये 5.8 आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच इन्फिनिटी डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल आहे. यामध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. यासोबतच कंपनीनं रिअर कॅमेऱ्याच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे. सॅमसंगनं Exynos 8895 SoC प्रोसेसरसोबत दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आलं आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये बायोमेट्रिक अनलॉक सिस्टम देण्यात आला आहे. गॅलसी S8 मध्ये 3000 mAh बॅटरी तर S8 प्लसमध्ये 3500 बॅटरी देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलक्सी S8मध्ये 5.8 आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच इन्फिनिटी डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल आहे. यामध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. यासोबतच कंपनीनं रिअर कॅमेऱ्याच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे. सॅमसंगनं Exynos 8895 SoC प्रोसेसरसोबत दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आलं आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये बायोमेट्रिक अनलॉक सिस्टम देण्यात आला आहे. गॅलसी S8 मध्ये 3000 mAh बॅटरी तर S8 प्लसमध्ये 3500 बॅटरी देण्यात आली आहे. Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















