एक्स्प्लोर
फेसबुकचं नवं फीचर लवकरच यूजर्सच्या भेटीला

मुंबई: फेसबुकचं फोटो शेअरिंग 'अॅप मोमेंट्स' आत मोबाइलसोबतच वेबसाइटवर देखील उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे यूजर्स आपल्या अब्लमची लिंक शेअर करु शकणार आहे. टेक वेबसाइट टेकक्रंच डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, 'पहिले हे अॅप फारच मर्यादित होतं. फक्त फेसबुक मित्रांसोबतच फोटो शेअर करता येत होते. पण आता जे फेसबुवर नाहीत त्यांनाही वेबलिंकवरुन अल्बममधील फोटो पाहता येणार आहेत.' यूजर्स या फीचरचा वापर करुन आपले जुने अल्बमही शेअर करु शकतात. त्यासाठी आपल्या मोबाइलच स्क्रिनच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तीन बिंदूंवर क्लिक करायचं आहे. जिथं त्यांना लिंक शेअर हा ऑप्शन दिसेल. या नव्या ऑप्शनमुळे तुम्हाला यूएलआर मिळेल. ती यूएलआर तुम्ही ईमेल आमि मेसेजही करु शकता. अॅपमधील हे फीचर जास्त रेझ्युलेशन असणाऱ्या फोटोलाही सपोर्ट करेल.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story





















