एक्स्प्लोर

वाद स्नॅपचॅटचा, फटका स्नॅपडीलला

मुंबई : स्नॅपचॅट हे अ‍ॅप फक्त श्रीमंतांसाठी आहे, भारतासारख्या गरीब देशांसाठी नाही, असं वक्तव्य करुन स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पिगेल चांगलेच अडचणीत सापडले. मात्र याचा फटका या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या ‘स्नॅपडील’ या अ‍ॅपला बसला. नेटिझन्सने #BoycottSnapchat ही मोहीम सुरु केली, त्यामुळे अनेकांनी स्नॅपचॅट हे अॅप अनइन्स्टॉल केलं. मात्र अनेकांनी चुकीने स्नॅपचॅट समजून स्नॅपडीलच मोबाईलमधून डिलीट केलं. त्यामुळे या वादाचा स्नॅपडीललाही विनाकारण फटका बसला. भारतीय नेटिझन्सनी स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. त्यानंतर इव्हान स्पिगेल यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. मात्र तरीही भारतीय नेटिझन्सनी स्नॅपचॅट विरोधातील मोहीम सुरुच ठेवली आणि अॅप डिलीट करुन या अॅपचं प्ले स्टोअर्सवरील मानांकनही कमी केलं. अॅप स्टोअरनं दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या ग्राहक रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. रविवारी सकाळी स्नॅपचॅटला दीड रेटिंग (9527 रेटिंग) मिळलं आहे. पण इतरांच्या अॅपच्या स्पर्धेतही स्नॅपचॅटनं चांगलीच मान टाकली आहे. सध्या स्नॅपचॅटला एक किंवा दीड (6099 रेटिंग) रेटिंग मिळत आहे. स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आहे. स्नॅपचॅटचे माजी कर्मचारी अँथनी पॉम्पलियानो यांनी स्नॅपचॅटच्या सीईओंचं हे वक्तव्य उघडकीस आणलं. त्यांनी 2015 मध्ये आपल्याला भारतासारख्या गरिब देशांसाठी आपलं अॅप नसल्याचं पॉम्पलियानो यांना सांगितलं होतं. दरम्यान, ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्नॅपचॅटला नेटिझननी ट्रोल करुन चांगलाच फटका दिला आहे. भारतीयांनी ट्विटरवर #boycottsnapchat ही मोहिम सुरु केली आहे. स्नॅपचॅटविरोधातील भारतीयांची ही मोहिम ट्विटरवर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

संबंधित बातमी : स्नॅपचॅटचा सीईओ म्हणतो, आमचं अॅप श्रीमंतांसाठी, भारत गरीब देश!

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget