एक्स्प्लोर
Paytm Pre-GST Sale: गॅझेटवर बंपर सूट, 20,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक!
मुंबई: पेटीएमनं नुकतंच आपली ई-कॉमर्स रिटेल वेबसाईट पेटीएम मॉल लाँच केली आहे. याच वेबसाईटवर आता गॅझेट सेलची घोषणा करण्यात आली आहे. देशात जीएसटी लागू होण्याआधी पेटीएम मॉलनं प्री-GST सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये कंपनीनं स्मार्टफोन, लॅपटॉपसह सर्व गॅझेटवर बंपर कॅशबॅक ऑफरही दिली आहे. हा सेल 13 जून ते 15 जूनपर्यंत असणार आहे.
प्री-जीएसटी सेलमध्ये पेटीएम मॉलवर काही खास प्रोडक्टवर तब्बल 20,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात आलं आहे. टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन, डीएसएलआर कॅमेरा यावर 20,000 रु. पर्यंत कॅशबॅक मिळू शकतं. एलजी, सोनी, सॅमसंग यासारखे टीव्ही ब्रॅण्ड तर अॅपल, डेल, लेनोव्हो यासारख्या लॅपटॉप ब्रॅण्डवर ही सूट मिळणार आहे.
पेटीएमनं या सेलमध्ये एक खास गिफ्टही यूजर्ससाठी ठेवलं आहे. या सेलमध्ये 1000 रुपयांची खरेदी करणाऱ्या काही लकी ग्राहकांना आयफोन 7 जिंकण्याची नामी संधी आहे.
जीएसटीमुळे काही गोष्टींच्या किंमती वाढण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्या आपल्या सध्याच्या प्रोडक्टचा खप होण्यासाठी सेल सुरु करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement