एक्स्प्लोर
आता 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ओटीपीची गरज नाही
मुंबई : ओटीपी अर्थात वन टाईम पासवर्डची आता दोन हजार रुपयांच्या ऑनलाईन व्यवहारांसाठी गरज नसणार आहे. ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षितेसाठी ओटीपीचा वापर करण्यात येतो. याअंतर्गत ऑनलाईन पैसे देण्याअगोदर एक पासवर्ड तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो. तो टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होतो.
मात्र आता 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी ओटीपीची गरज नसल्याने हे व्यवहार अधिक जलद होणार आहेत. दरम्यान, 2 हजार रुपयांवरच्या व्यवहारांसाठी ओटीपीची गरज असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement