एक्स्प्लोर

Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना

Nagpur Crime News: सुनेवर जादूटोणा केल्याचा संशय हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे लेआउट, पिवळी नदी परिसरात अंधश्रद्धेतून सुनेची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना (Nagpur Crime News) घडली. लक्ष्मी रविशंकर पाली (४०-४५) असे मृत महिलेचे नाव असून, नाथूलाल पाली (७०) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी यांची मुलगी नोकरीवर तर मुलगा घराबाहेर गेला होता. लक्ष्मी घराच्या मागील बाजूस कपडे धुत असताना नाथूलाल यांनी संधी साधून त्यांच्यावर कुऱ्हाडीने (Nagpur Crime News) हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने लक्ष्मी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर नाथूलाल यांनी घरामागील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर यशोधरानगर पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, आरोपीला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनेवर जादूटोणा केल्याचा संशय हत्येमागील कारण असल्याचे सांगितले जात असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.(Nagpur Crime News)

मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने केली सुनेची कुऱ्हाडीने हत्या

आपल्या मुलाला जादूटोणा करून मारल्याचा संशय घेऊन ७० वर्षीय सासऱ्याने सुनेवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास पिली नदी परिसरातील पाहुणे ले-आउटमध्ये घडली. सुनेची हत्या केल्यानंतर आरोपी सासऱ्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तर आरोपी नत्थूलालच्या पत्नीची मानसिक स्थितीही ठीक नसल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि संशयातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे पाहुणे ले-आउट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Nagpur Crime News)

सूनेला संपवलं अन् विहिरीत घेतली उडी

लक्ष्मीची हत्या केल्यानंतर नत्थूलाल घराबाहेर पडला. घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिराजवळील विहिरीत त्याने उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी नत्थूलालला विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. शरीरात पाणी गेल्याने त्याच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यशोधरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नत्थूलालच्या मुलाचा २०१९ मध्ये मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर नत्थूलालच्या मनात सुनेबद्दल संशय निर्माण झाला. लक्ष्मीने जादूटोणा करून आपल्या मुलाचा जीव घेतल्याचा त्याचा समज होता. याच संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. नत्थूलाल हा लक्ष्मीला 'तुलाही मारून टाकीन आणि त्यानंतर स्वतःही जीव देईन', अशी धमकी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

शुक्रवारी सायंकाळपासून नत्थूलाल आणि लक्ष्मी यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. संतापलेल्या नत्थूलालने कुऱ्हाड हातात घेत लक्ष्मीवर हल्ला केला. कुऱ्हाडीचे वार गंभीर लागल्याने लक्ष्मीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी नत्थूलालविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget