मुंबई : चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने भारतात आपला नवा स्मार्टफोन Oppo F19 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने F सीरिज अंतर्गत लॉन्च केला आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये असलेलं फास्ट चार्जिंग फिचर. यामध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. जाणून घेऊया फोनची किंमत आणि फिचर्सबाबत... 


किंमत आणि ऑफर 


Oppo F19 ला भारतात 18,990 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आलं आहे. तुम्ही हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरही करु शकता. ओप्पोच्या या फोनचा पहिला सेल 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्डावर फ्लॅट 7.5 टक्के कॅशबॅक ऑफर ग्राहकांना देण्यात आली आहे. 


स्पेसिफिकेशन्स 


Oppo F19 फोनमध्ये 6.43 इंचांचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये पंच होल कटआऊट दिलेला आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फोन अॅन्ड्रॉईड 11 बेस्ड कलर ऑपरेटिंग सिस्टम 11.1 वर काम करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 662 प्रोसेसर आहे. तसेच 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलेला आहे. 



कॅमेरा 


फोटोग्राफीसाठी Oppo F19 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. त्याचसोबत फोनमध्ये 2 मेगापिक्सलचे दोन इतर कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. 


दमदार बॅटरी 


पावरसाठी Oppo F19 में 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 33W ची फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळते. कंपनीने दावा केला आहे की, फोनला पाच मिनिटांसाठी चार्ज केल्यानंतर साडेपाच तासांसाठी कॉलिंग आणि दोन तासांसाठी युट्यूब पाहू शकता. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक यांसारखे फिचर्स देण्यात आलेले आहेत. 


Samsung Galaxy F12 सोबत स्पर्धा 


Oppo F19 ची स्पर्धा भारतात Samsung Galaxy F12 सोबत होणार आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले देण्यात आलेला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटसोबत येतो. फोन अॅन्ड्रॉईड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर दिलेला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कैमरा सेटअप दिलेला आहे. ज्याचा प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल आहे. 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर याच्या  4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :