Tech News | स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. काही लोक फोनचा इतका वापर करतात की काही तासात फोनची बॅटरी संपते आणि ते सार्वजनिक ठिकाणीच मोबाईल चार्ज करण्यास सुरवात करतात. हे त्या लोकांसाठी किती हानिकारक आहे हे देखील त्यांना माहिती नाही. त्यांना कदाचित हे माहित नाही की हॅकर्स या चार्जिंग पॉईंटवर लक्ष ठेवतात आणि फोनचा डेटा लीक करतात आणि आपल्याला त्याबद्दल देखील माहिती नसते. 


रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मॉल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी असे चार्जिंग पॉईंट आपल्याला बर्‍याचदा आढळतील. अशा चार्जिंग पॉईंटवर हॅकर्स त्यांचं टार्गेट शोधतात, जिथे जास्त लोक त्यांचे फोन चार्ज करतात. आपण या चार्जिंग पॉइंट्सवर स्थापित यूएसबीसह आपला फोन चार्ज करत असल्यास, बँक अॅप्स, यूपीआय अॅपचा लॉगिन आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, जीमेलसह पासवर्ड, लॉग इन हॅकर्सकडे जाण्याची शक्यता असते. हे यूएसबी आपल्या फोनचा सर्व डेटा कॉपी करते, त्यानंतर हॅकर्स आपले बँक खाते साफ करतात.


मेलवेअर इन्स्टॉल करतात


इतकेच नाही तर हॅकर्स या यूएसबीच्या मदतीने तुमच्या फोनमध्ये व्हायरस इन्स्टॉल करु शकतात. ज्यामुळे फोन चार्ज होईल आणि फोनमधील डेटा देखील कॉपी केला जाईल. किती वेळ डेटा चोरी करायचा आहे त्यानुसार हे हॅकर्स त्यांची निर्मिती करतात. यामध्ये कुकीजद्वारे डेटा कॉपी केला जातो.


अशा हॅकर्सचं लक्ष्य होऊ नये म्हणून, नेहमीच पॉवर बँक आपल्याकडे ठेवा किंवा आपल्या स्वतःच्या डेटा केबलचा वापर करा. आपत्कालीन परिस्थितीत, जर आपल्याला सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करावा लागला असेल तर मोबाईल बंद करा आणि आपल्या स्वतःच्या केबलने चार्ज करा. फोन बंद आणि चालू केल्यावर डेटा ट्रान्सफर होऊ शकत नाही.