नवी दिल्ली : सॅमसंग कंपनीने बुधवारी Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 या आपल्या मोबाईल फोन्सचे लॉन्चिंग केले आहे. या फोनची चर्चा गेली अनेक दिवस सुरु होती आणि याची उत्सुकताही ताणली होती. Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 चे लूक अत्यंत शानदार आहे आणि त्यामध्ये अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. Samsung Galaxy A52 ला 5G मध्ये लॉन्च केलं आहे तर Galaxy A72 केवळ 4G मध्ये लॉन्च केलं आहे. 


Samsung Galaxy A52 ला दोन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे जो 6GB RAM + 128GB स्टोरेजच्या सुविधेसह आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजच्या सुविधेसह उपलब्ध आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी ए52 च्या 4जी व्हेरिएन्टला युरोपीय देशांत 349 यूरो म्हणजे 31,180 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीने लॉन्च केलं आहे. त्याचवेळी गॅलेक्सी ए52 च्या 5जी व्हेरिएन्टला 429 यूरो म्हणजे 37,100 रुपयांना लॉन्च केलं आहे.


कंपनी ने Samsung Galaxy A72 मध्येही 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केलं आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए72 ची सुरुवातीची किंमत ही 38,830 रुपये इतकी आहे. सॅमसंगच्या ए सीरीजच्या या स्मार्टफोन्सना गॅलेक्सी एम-सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त किंमतीत लॉन्च करण्यात आलं आहे.


Samsung Galaxy A52 5G चे वैशिष्ट्य
सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A52 ची स्पेसिफिकेशन आणि फिचर्सची तुलना केल्यास या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज इतका आहे. हा फोन IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आणि Octa-core प्रोसेसर या फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी वापरण्यात आली आहे जी 25 वॉच फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत आहे. त्याचवेळी सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या कॅमेराचा विचार करता यामध्ये 64 मेगापिक्सेल प्राइमरी सेंसर वाला क्वॉड रियर कॅमरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 एमपीचा मायक्रोफोनची सुविधाही आहे. यामध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा आहे. 


संबंधित बातम्या :