मुंबई : Oppo A94 5G ने युरोपियन बाजारात लॉन्च केलेला Oppo Reno 5Z 5G हा फोन गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये दाखल झाला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा  4G सक्षम  A94 लॉन्च करण्यात आला. Oppo A94 5G मध्ये जी वैशिष्ट्य आहेत ती Oppo Reno 5Z 5G समानच आहेत. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 800U SoC, क्वॉड रेअर कॅमेरा सेटअप, सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच कटआऊट देखील आहे. या फोनचे मॉडेल्स दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यात एक रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनदेखील आहे. फोन हाताळण्यासाठी फार हलका असणार आहे, याच्या कडा अगदी स्लिम आहेत.


Oppo F19 भारतात लॉन्च; फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक खास फिचर्स


Oppo A94 5G ची किंमत
Oppo A94 5G या फोनची किंमत जवळपास 32,000 रुपये आहे. यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. कॉस्मो ब्लू आणि फ्लुइड ब्लॅक कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. अनेक युरोपिअन वेबसाईट्सवर हा फोन लिस्टेड आहे. साधारण 3 मे पासून हा फोन विक्रीसाठी बाजारात येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कधी उपलब्ध होणार याबाबत कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिली नाही.


Samsung Galaxy SmartTag+ ची 16 एप्रिलपासून भारतात विक्री, ट्रॅकर म्हणून काम करणार डिवाईस


Oppo A94 5G ची वैशिष्ट्य
Dual SIM (Nano) असलेला हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालतो. यात 6.4 इंच फूल एचडी + 1080 X 2400 Pixels AMOLED डिस्प्ले ज्यासोबत 90.8% स्क्रिन बॉडी रेशो पिक्सेल डेनसिटी आणि 800 Nits peak Brightness देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 800U SoC, 8FB LPDDR4X Ram आणि 128GB ऑनबोअर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे.


गूगल मॅप रस्त्यांबरोबर आता कोरोना हॉटस्पॉटही दाखवणार



'या' बेस्ट ऑफर्ससह करु शकाल OnePlus 9, OnePlus 9R ची खरेदी


Cheap smartphones | सात हजारांच्या आत मिळणारे स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स


Xiaomi mi 11 ultra लवकरच भारतात लॉन्च होणार; काय असणार किंमत आणि फीचर्स?