Tech News | कमी किंमतीत एक उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काही चांगले पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सात हजार रुपयांच्या आत कोणते स्मार्टफोन उपलब्ध आहेत पाहुयात. या स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये आणि किंमत पाहुयात. 


Realme C11- किंमत: 6,999 रुपये


या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येऊ शकतो. त्याच वेळी यात 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक हिलियो G35 प्रोसेसर आहे.


Infinix Smart HD 2021-- किंमत: 6,499 रुपये


या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. 6.1 इंच एचडी + डिस्प्ले आहे. 8 मेगापिक्सलचा रियर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक हिलिओ A20 प्रोसेसर आहे.


Redmi 8A Dual- किंमत: 6,999 रुपये


या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. 6.22 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. 13 मेगापिक्सलचे 2 रियर कॅमेरे आणि 2 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे.


Tecno Spark Go 2020- किंमत: 6,999 रुपये


फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. यात एचडी + डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि AI लेन्ससह ड्युअल रीअर कॅमेरा आहे तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक हेलियो A20 क्वाडकोर प्रोसेसर आहे.


Gionee Max Pro- किंमत: 6,499 रुपये


या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात 6.52 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर येथे 13-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी रीअर सेन्सर आहे.  तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.


Itel Vision1- किंमत: 6,549 रुपये


या फोनमध्ये 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. 6.088 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल आणि 0.3 मेगापिक्सलचा ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे. तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4000mAh बॅटरी आणि  Unisoc SC9863A ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.