मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp सध्या सगळ्यांच्या गरजेचं अॅप बनलं आहे. हे अॅप केवळ चॅटिंगपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. यामध्ये वॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसह पेमेंट करण्याचीही सुविधा मिळते. अॅप कायमच आपल्या युजरच्या गरजांची काळजी घेतं. बऱ्याचदा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत वाट पाहत जागे राहतो. तसंच एखाद्याला महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असतो पण तोपर्यंत वाट पाहण्याची इच्छा नसते. पण या लेखाच्या माध्यमातून अशी ट्रिक सांगणार आहोत, जी तुम्ही वापरली तर शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याची गरज नाही. पण तुमचा मेसेज मात्र तुम्हाला हव्या त्या वेळेतच संबंधितांना मिळेल. तर जाणून घेऊया या ट्रिकबद्दल.

तुम्ही WhatsApp वर मेसेज शेड्यूल करु शकता. जर तुम्हाला एखाद्याला 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज करायचा असेल तर ही ट्रिक तुमच्या कामाची आहे. 

WhatsApp वर मेसेज असे शेड्यूल करा

- व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवरुन SKEDit नावाचं थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करावं लागेल.

- आता यानंतर अॅप ओपन करुन साईन अप करा.

- आता लॉगइन केल्यानंतर मेन्यूमध्ये दिलेल्या WhatsApp ऑप्शनवर टॅप करा.

- हे केल्यानंतर तुमच्याकडून काही परवानग्या मागितल्या जातील.

- आता Enable Accessibility वर क्लिक करुन Use service वर टॅप करा.

- आता तुम्हाला ज्या कोणत्या व्हॉट्सअॅप चॅटवर मेसेज शेड्यूल करायचं आहे, त्या कॉन्टॅक्टचं अॅड करा. मग मेसेज टाईप करुन तारीख आणि वेळ सेट करा. 

- एवढं केल्यानंतर सेट केलेल्या तारीख आणि वेळेवर मेसेज आपोआप संबंधित कॉन्टॅक्टला जाईल.