मुंबई : स्मार्टफोन कंट्रोल करण्यासाठी सॅमसंग कंपनीने नुकतच एक  डिवाईस लॉन्च केलं आहे.  Samsung Galaxy SmartTag+ असं या डिवाईसचं नाव आहे.  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या डिवाईसच्या मदतीने घरातील इतर डिवाईस सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकतात. सॅमसंगचं हे ब्लूटूथ डिव्हाइस आहे, जे कंपनीने यूजर फ्रेंडली बनवलं आहे. यापूर्वीही कंपनीने एक व्हेरिएंट लॉन्च केलं होतं. हे त्याचं अपग्रेड व्हर्जन आहे.


गॅलेक्सी स्मार्टटॅग प्लस लेटेस्ट व्हर्जन जवळपास 3 हजार रुपयांना आहे. तसेच दोन युनिट घेतल्यास त्याची किंमत जवळपास 4,800 ठेवण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर जुनं व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर नवीन व्हेरिएंट भारतात 16 एप्रिल रोजी लाँच केला जाईल. हे स्मार्टटॅग प्लस डिव्हाइस सर्वप्रथम अमेरिकेत लाँच केलं आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे डिवाईस ब्लुटूथला सपोर्ट करतं आणि  ट्रॅकरच्या स्वरुपात काम करतं.


काय आहेत फीचर्स?


हे एक स्मार्ट डिव्हाइस आहे ज्याद्वारे आपण आपल्या घरातील इतर इलेक्ट्रॉनिक डिवाईस नियंत्रित करू शकतो. आपण घाईत आपले घर बंद करुन घरातील एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करालयला विसरतो तर या डिवाईसच्या सहाय्याने आपण ते सहज बंद करू शकतो. हे एक अतिशय प्रभावी डिवाईस मानलं जात आहे. भारतातील लोक देखील या डिवाईसची प्रतीक्षा करत आहेत.