OnePlus Smart Watch : वनप्लसने आता प्रथमच आपल स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. स्मार्ट वेअर सेगमेंटमध्ये वनप्लसचं हे पहिलं स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्च खास असल्याचं सांगितली जात आहे. या स्मार्टवॉचची किंमत भारतात 16,999 रुपये असणार आहे.
या घड्याळाच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचं, तर यात 1.39 चा HD AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचं स्क्रीन रिझोल्यूशन 454x454 पिक्सल आहे. डिस्प्ले 2.5 डी ग्लाससह सुसज्ज आहे, तर त्यात 326 पीपीआय डेन्सिटी आहे. हे स्मार्टवॉच गोल डायमध्ये 44 मिमी आकाराचं आहे.
14 दिवसांची बॅटरी लाइफचा दावा
वनप्लस कंपनीच्या माहितीनुसार, वनप्लस वॉचमध्ये 402mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. याबद्दल दावा करताना कंपनीने म्हटले आहे की, एका चार्जिंगमध्ये हे स्मार्टवॉच 14 दिवस वापरता येऊ शकेल. त्याचबरोबर वनप्लस वॉचमध्ये 4 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. स्मार्टवॉच दोन रंगात लॉन्च करण्यात आलं आहे. मिडनाइट ब्लॅक आणि मूनलाईट सिल्व्हर हे दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. वनप्लस वॉचमध्ये जीपीएस कनेक्टिव्हिटीसह अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.
Budget Smart Watch | उत्तम फीचर्ससह बजेट स्मार्टवॉच
20 मिनिटांत फुल चार्ज
चार्जिंग टेक्नॉलॉजीबद्दल बोलताना, वनप्लस वॉचला Wrap फास्ट चार्जिंग म्हणून सादर केले गेले आहे. हे स्मार्टवॉच पूर्ण चार्ज केवळ 20 मिनिटांत करता येते. यात Google Wear OS देखील देण्यात आला आहे. तसेच, 100 हून अधिक स्पोर्ट मोड देण्यात आले आहेत. SOP 2 ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर यासह इतर वैशिष्ट्ये यात देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :