मुंबई : भारतात मुख्य युझरला  अकाऊंटचा पासवर्ड शेअर न करण्यासाठी नेटफ्लिक्स नवीन फीचर तयार करत आहे. या फिचरनुसार नेटफ्लिक्सवर  लॉग इन करण्यासाठी मुख्य अकाऊंट होल्डरला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजवर पाठवलेली माहिती लॉग इन करताना भरावी लागते. एकाच सबस्क्रिप्शनवर  अनेक जण नेटफ्लिक्सचा आनंद घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर नेटफ्लिक्सनं हा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ ऑथराईज्ड यूझरला नेटफ्लिक्स पहताय याव्ं यासाठी ही सिस्टीम असल्याचं नेटफ्लिक्सनं सांगितलंय. याची सध्या चचाणी सुरू असल्याचं कळतंय.


प्रेक्षकांची संख्या वाढली


ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला माहिती मिळाली की, कोरोना संक्रमणाच्या काळात नेटफ्लिक्सच्या यूजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सच्या यूजर्सची संख्या 20  कोटीपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने ही संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.  घरी राहून देखील 2021 साली प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सवरील सिरीजवर फार कमी वेळ घालवताना दिसले. 


नेटफ्लिक्स ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा कंपनी आहे. नेटफ्लिक्स कायमच नवे नवे फिचर टेस्ट करत असते. नेटफ्लिक्सचे टर्म्स ऑफ सर्व्हिसचे म्हणणे आहे की, एका अकाऊंटवरून लॉगइन करणारे यूझर्स एकाच घरात असले पाहिजे. कंपनीने या गोष्टीला नकार दिला आहे की,ते शेअरिंग संदर्भात कोणता मोठा निर्णय घेणार आहे.