Samsang Smartphone : Samsung चा Galaxy M42 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. अद्याप त्याची लॉन्चची तारीख समोर आलेली नाही. हा फोन बर्याच वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. रिपोर्ट्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5जी स्मार्टफोन कंपनीच्या गॅलेक्सी ए 42 5जी चा रिब्रांडेड व्हर्जन असू शकतो. हा फोन गॅलेक्सी एम मालिकेचा पहिला 5जी स्मार्टफोन असेल. काय असतील Galaxy M42 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
Samsung Galaxy M42 5G ची वैशिष्ट्ये
या सॅमसंग फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर काम करेल. त्याच्या कॅमेर्याबद्दल सांगायचं तर सॅमसंग गॅलेक्सी एम 42 कडे मागील बाजूस 64 एमपीचा प्रायमरी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या समोर एक कॅमेरा सेटअप असेल. स्टोरेजच्या बाबतीत हा एक अतिशय पावरफुल फोन आहे. यात इंटरनल स्टोरेज 128 जीबी मिळेल.
5G Smartphones | 5G स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर स्वस्त पर्याय पाहा...
गेल्या वर्षी सॅमसंगने गॅलेक्सी ए 42 5 जी स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटसह देण्यात आला आहे. त्याच्या रॅम आणि बॅटरीबद्दल सांगायचं तर 8 जीबी रॅम आणि 5000 mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जरसह आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 एमपी प्राइमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 एमपी डेप्थ सेन्सर आणि 5 एमपी मॅक्रो लेन्स आहेत.
मोटोरोलाचे Moto G10 Power आणि Moto G30 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, काय आहेत फीचर आणि किंमत?
सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5 जी ची तुलना रिअलमी जीटी 5 जी सारख्या फोनशी केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त मोटोरोला, शाओमी आणि व्हिवो सारख्या कंपन्याही त्यांचे उत्तम 5 जी फोन बाजारात आणत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम 42 5 जी मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलल्यास 5000mAh बॅटरी वेगवान चार्जिंग सपोर्टसह दिली गेली आहे.