मुंबई: तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल किंवा जर तुम्हाला नवीन फोन गिफ्ट द्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. नुकतीच Realmeया चीनी स्मार्टफोन कंपनीने Realme C15 या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने या फोनची किंमत 1000 रुपयाने कमी केलीय. 
जाणून घ्या फोनची नवीन किंमत आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स


ही आहे नवीन किंमत
किंमत कमी झाल्यानंतर Realme C15 च्या 3GB रॅम मेमरी 32 GB स्टोरेज असलेल्या वेरीअंटची किंमत 9,999 रुपयांऐवजी 8,999 रुपये झाली आहे. तसेच 4 GB मेमरी आणि 64GB स्टोरेज असलेल्या वेरीअंटची किंमत 10,999 रुपयांवरुन 9,999 रुपये करण्यात आली आहे. 


या फोनची खासियत म्हणजे कमी किंमतीत क्वाड कॅमेरा सेटअप आणि 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 


स्पेसिफिकेशन्स
रिअलमी C15 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये हीलिओ G35 या प्रोसेसर चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. C15 स्मार्टफोनचे स्टोरेज एसडीकार्डद्वारे 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकतं. 


स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगाफिक्सलचा प्रायमरी कॅमेरा क्वॉड सेटअपसोबत आहे. सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


Redmi 9 Prime सोबत थेट स्पर्धा
Realme C15 स्मार्टफोनची स्पर्धा रेडमी 9 प्राईम स्मार्टफोनसोबत आहे. रेडमी 9 प्राइमचा 4 GB रॅम मेमरी आणि 64GB स्टोरेज असलेला वेरिअंट  9,999 रूपयांना मिळतो. तसंच 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेला वेरिअंट 11,999 रूपयांना मिळतो. रेडमी 9 प्राईम स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 चिपसेटचा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. रेडमी 9 प्राईम स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सल आहे. सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.