आजकाल स्मार्टवॉचची क्रेझ बरीच पाहायला मिळत आहे. सर्व वयोगटातील लोकांना स्मार्टवॉच घालायला आवडतात. स्मार्टवॉच अनेक गोष्टीमुळे लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. याद्वारे लोक त्यांचे दैनंदिन दिनचर्या व उपक्रमांचे परीक्षण करत आहेत. आपण स्मार्टवॉचद्वारे फोन कॉल आणि म्युझिक देखील नियंत्रित करू शकता. चला काही चांगल्या फीचर्ससह बाजारात दाखल झालेल्या काही बजेट स्मार्टवॉचवर नजर टाकूया.
Amazefit Bip S
अॅमेझफिटचं हे स्मार्टवॉच तुमच्या बजेटमध्ये आणि फीचर्समध्ये चांगलं आहे. हे अनेक अॅडवान्स फीचरसह हे स्मार्टवॉस सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले आहे, ज्याद्वारे आपण आपला फोन कनेक्ट करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि दैनंदिन कामांवर लक्ष ठेवण्यासाठी 10 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. स्पोर्ट्स मोडमध्ये झोप, अॅक्टिव्हिटीज, हार्ट रेट यासह अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केला की हे स्मार्टवॉच 15 दिवसांसाठी वापरले जाऊ शकते. या स्मार्टवॉचची किंमत 3999 रुपये आहे.
BoAt Storm
बोट स्टॉर्म स्मार्टवॉच अनेक उत्तम फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस उत्तम ठेवण्यासाठी अनेक पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 9 स्पोर्ट्स मोड आहेत. या स्मार्टवॉचसह आपण फोन कॉल, नोटिफिकेशन, मेसेज, अलार्म आणि रिमांयडर मॅनेज करू शकता. त्याचा वेलनेस मोड तुमची झोप, हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन पातळीचे परीक्षण करते. विशेष म्हणजे हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. त्याची किंमत फक्त 2499 रुपये आहे.
Noise ColorFit Pro 2
Noise ColorFit Pro 2 अतिशय आकर्षक डिझाईन सोबत येते. यात 1.3 इंचाची टचस्क्रीन आहे. त्याच वेळी, आरोग्य आणि डेली अॅक्टिविटी ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती देण्यात आल्या आहेत. या स्मार्टवॉचसह आपण फोन कॉल, मेसेज, नोटिफिकेशन आणि म्युझिक कंट्रोल करू शकता. या व्यतिरिक्त, धावणे, योग व्यतिरिक्त आपण हार्ट रेटची माहिती घेऊ शकता. हे वॉटरप्रूफ असून त्याची किंमत 2999 रुपये आहे.