'या' बेस्ट ऑफर्ससह करु शकाल OnePlus 9, OnePlus 9R ची खरेदी
OnePlus 9 OnePlus 9R Sale in India: OnePlus 9 आणि OnePlus 9R या दोन्ही मोबाईलची विक्री अॅमेझॉनवर सुरु करण्यात आली आहे.
OnePlus च्या लेटेस्ट सीरिजमधील OnePlus 9 आणि OnePlus 9R या रेंजमधील मोबाईल फोनची पहिली विक्री भारतात सुरु झाली आहे. ई- कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर आज दुपारी 12 वाजल्यापासून ही विक्री सुरु झाली आहे. सध्याच्या घडीला ही हा सेल Red Cable Club मेंबर्ससाठी असून नॉन प्राईम मेंबर्ससाठी हा सेल उद्या दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
स्मार्टफोनप्रेमींना या सेलची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा लागून राहिली होती. या मोबाईलचे एकंदर फिचर आणि स्पेसिफिकेशन पाहता मोबाईल प्रेमींसाठी ही पर्वणी ठरत आहे.
किंमत आणि ऑफर्स
OnePlus 9 च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. 12GB रॅम आणि 256GB व्हॅरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय OnePlus 9R च्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हॅरिएंटची किंमत 39,999 इतरी आहे. सेलमध्ये OnePlus 9 वर एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईएमआयच्या माध्यमातून तीन हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. तर, OnePlus 9R वर 2 हजार रुपयांची सूट आहे. याव्यतिरिक्त 14 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत एसबीआय क्रेडिट कार्डवर सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय हा पर्यायही मिळत आहे.
OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 मध्ये 6.55 इंच फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझोल्युशन 2400 x 1080 पिक्सल इतकं आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. परफॉर्मन्ससाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. 5 जी कनेक्टिवीटी सपोर्टसह हा फोन लाँच करण्यात आला आहे.
OnePlus 9R चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 मध्ये 6.55 इंच फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रेझोल्युशन 1920x1080 पिक्सल इतकं आहे. हा फोन Android v11 ऑपरेटींग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आणि 5 जी कनेक्टिवीटीही देण्यात आली आहे.