एक्स्प्लोर

बस-रिक्षाची वाट पाहून कंटाळालात? आता ई-बाईकने चला बीकेसीत!

मुंबईत वांद्रे किंवा कुर्ला स्थानकादरम्यान रिक्षा बसची वाट पाहून कंटाळण्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येतो. बीकेसीमध्ये पर्यावरणापुरक ई-बाईकच्या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठी गर्दी टाळत इच्छित स्थळी जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई : मुंबईत वांद्रे किंवा कुर्ला स्थानकादरम्यान रिक्षा-बसची वाट पाहून कंटाळण्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असतो. पण वाहतुकीची ही गैरसोय टाळण्यासाठी आता बेस्ट आणि ऑटोरिक्षा यांना वाहतुकीचा पर्याय म्हणजे युलू सायकलचा वापर प्रवाशांना उपलब्ध झाला आहे. नवी मुंबईनंतर आता बीकेसीमध्ये पर्यावरणास पुरक अशा ई-बाईकच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी गर्दी टाळतच आपल्याला इच्छित स्थळी जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सातत्याने विविध प्रकल्प हाती घेत आहे. त्याचप्रमाणे, पर्यावरण प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून प्राधिकरण वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये सार्वजनिक सायकलचा उपक्रम सुरू केला आहे. या सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने युलू संस्थेसोबत दिनांक 31 जानेवारी 2020 मध्ये सामंजस्य करारनामा साक्षांकित केला आहे. या सेवेमुळे वांद्रे आणि कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुलास एका आधुनिक, पर्यावरण पूरक, इंजिन विरहित पद्धतीने जोडण्यात आला आहे. सुरुवातीस अठरा स्थानके करण्यात आली असून वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सर्वात जवळचे स्थानक एसआरए इमारतीजवळ आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार सदर स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल.

बस-रिक्षाची वाट पाहून कंटाळालात? आता ई-बाईकने चला बीकेसीत!

युलू सायकल वापराचे दर

यूलू सायकलचा वापर करण्यासाठी सुरुवातीला 5 रुपये हा अन-लॉकिंग शुल्क दर म्हणून आकारला जाईल. त्यानंतरचा वापर करण्यासाठी प्रत्येक मिनिटांसाठी रुपये दीड याप्रमाणे दर आकारण्यात येईल. या सेवेमध्ये प्रतिमहिना रिचार्ज सुविधा उपलब्ध असून 20 ते 100 टक्के प्रमाणे सूटसुद्धा युलू संस्थेमार्फत देण्यात येईल.

बस-रिक्षाची वाट पाहून कंटाळालात? आता ई-बाईकने चला बीकेसीत!

कोरोनाचा पार्श्वभूमीवर युलूमार्फत सायकल्स पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात येत आहेत. याबाबतीत योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. प्रस्तावित सार्वजनिक सायकल सेवा ही फेब्रुवारी 2020 मध्ये चालू करण्याचे प्रस्तावित होते पण कोविड -19 परिस्थितीमुळे सदर सेवेची सुरुवात दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पासून सुरु झाली असून सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवेचा लाभ घेण्यास प्राधिकरणामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Embed widget