एक्स्प्लोर
Advertisement
फेसबुकचं जिओ फोनला ‘लाईक’
रिलायन्स जिओने जिओ फोनसाठी नवा प्लॅनही बाजारात आणला आहे. ज्यामध्ये 49 रुपयात यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग मिळेल, मात्र एक जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.
मुंबई : सोशल मीडियातील जायंट अर्थात फेसबुक आता जिओच्या फोनवरही उपलब्ध होणार आहे. यासाठी खास फेसबुक अॅप तयार करण्यात आलं आहे. या अॅपचं व्हर्जन विशेषत: KaiOS साठी डिझाईन करण्यात आलं आहे.
जिओ फोन KaiOS वर चालतं, जी वेब बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे. जिओ फोनवर फेसबुक वापरताना या नव्या अॅपमुळे एक वेगळा फिल यूझर्सना मिळणार आहे. अॅपच्या या खास व्हर्जनमध्ये पुश नोटिफिकेशन, व्हिडीओ आणि एक्स्टर्नल कंटेट लिंकचा सपोर्टही असेल.
फेसबुकचं हे अॅप खास करुन जिओ फोनच्या कर्सर फंक्शनला सपोर्ट करणारं बनवण्यात आले आहे.
जिओ फोन स्वस्त 4जी VoLTE फीचरफोन आहे. जुलै 2017 मध्ये या फोनचं लॉन्चिंग करण्यात आले. हा फोन खरेदी करण्यासाठीही जिओने विशेष ऑफर जाहीर करत, रक्कम भरण्यासाठी खास इन्सॉलमेंट पद्धतही जाहीर केली होती.
दरम्यान, रिलायन्स जिओने जिओ फोनसाठी नवा प्लॅनही बाजारात आणला आहे. ज्यामध्ये 49 रुपयात यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग मिळेल, मात्र एक जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement