एक्स्प्लोर

भारतात एकही डिजिटल पेमेंट अॅप पूर्णपणे सुरक्षित नाही : क्वालकॉम

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सरकारने आता डिजिटल पेमेंटकडे मोर्चा वळवला आहे. मात्र मोबाईल बँकिंग किंवा वॉलेट अॅपद्वारे केले जाणारे व्यवहार भारतात पूर्णपणे सुरक्षित नसल्याचा खुलासा मोबाईल चिपसेट मेकर कंपनी क्वालकॉमने केला आहे. बँकेचे किंवा वॉलेट अॅप केवळ सॉफ्टवेअर स्तरावरील सिक्युरिटी वापरतात. डिजिटल पेमेंट अॅपसाठी हार्डवेअर स्तरावरील सिक्युरिटीची आवश्यकता आहे. यामुळे ग्राहकांचे पासवर्ड, कार्ड नंबर यांची माहिती स्मार्टफोनमधून चोरी होऊ शकते, असं क्वालकॉमचे उत्पादन व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ संचालक एस. वाय. चौधरी यांनी म्हटलं आहे. भारतातील स्मार्टफोनमध्ये अत्यंत बेसिक सिक्युरिटी : चौधरी भारतातील एक सर्वात प्रसिद्ध डिजिटल पेमेंट अॅप देखील हार्डवेअर सिक्युरिटी वापरत नसल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. क्वालकॉम ही स्मार्टफोन क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक चिपसेट मेकर कंपनी असून जागतिक बाजारात क्वालकॉमचा वाटा 37 टक्के एवढा आहे. स्मार्टफोन युझर्स मोबाईल पेमेंट अॅप डाऊनलोड करतात. मात्र हे अॅप मूळ निर्मात्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरवरच काम करतात. त्यामुळे युझर्सना अपमध्ये हार्डवेअर स्तरावरील सिक्युरीटी आहे, की नाही, याची माहिती मिळत नाही. डिजिटल पेमेंटच्या सुरक्षेसाठी क्वालकॉमचा पुढाकार क्वालकॉम आता मोबाईल अॅपच्या सुरक्षिततेबाबत डिजिटल पेमेंट कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचंही चौधरी यांनी म्हटलं आहे. क्वालकॉमकडून मोबाईलमध्ये आता एक अशी टेक्नॉलॉजी पुरवली जाईल, ज्यामुळे युझर्सचा डेटा सर्व प्रकारच्या मालवेअरपासून सुरक्षित राहील, अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे. क्वालकॉमचं हे नवीन मोबाईल चिपसेट फीचर ग्राहकांना 2017 पासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे युझर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहण्यास मदत होईल. 'डिव्हाईल अॅटेस्टेशन' हे फीचर 2017 पासून रोल आऊट करण्यात येईल. सर्व स्मार्टफोन युझर्सना हे फीचर 2017 च्या अखेरपर्यंत मिळेल, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. यासाठी एका सॉफ्टवेअर मेकर कंपनीशी करार करण्यात येणार असून ही कंपनी युझर्सना मालवेअर आणि व्हायरस विषयी अलर्ट करणार आहे. दरम्यान चौधरी यांनी भारतीय आधार प्रणालीचंही कौतुक केलं. भारत सरकारची आधार प्रणाली आता डिजिटल पेमेंटकडे वळणार आहे. आधारचं असं नवं व्हर्जन तयार करणारं भारत जगातलं पहिलं सरकार आहे, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. संबंधित बातम्या :

इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल?

इंटरनेट स्पीडमध्ये जगाच्या तुलनेत भारत कुठे?

आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप

2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी बिनधास्त स्वाईप करा, सेवा कर नाही!

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?

पेटीएम वॉलेट आता इंटरनेटशिवाय वापरता येणार, ऑफलाईन सेवा सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget