एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोकिया 3310 लवकरच बाजारात येणार!
मुंबई : एकेकाळी सर्वात लोकप्रिय असलेला नोकियाचा 3310 हा फोन बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या दमदार बॅटरी बॅकअपसाठी प्रसिद्ध असलेला हा फोन 4 हजार रुपयांमध्ये रिलाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
नोकिया 3310 हा फोन अजूनही काही ठिकाणी उपलब्ध आहे. नोकियाकडून या फोनची विक्री केली जात नसली तरी काही विक्रेत्यांकडे हा फोन सध्या उपलब्ध आहे.
नोकिया 3310 फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात?
स्पेनमधील बार्सिलोनात होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये नोकिया 3310 बाजारात कधी येईल याबाबत स्पष्ट होईल, असं बोललं जात आहे.
17 वर्षांपूर्वी हा फोन 2 हजार रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचा बॅटरी बॅकअप चांगला आहे. त्यामुळे युझर्सना हा फोन सेकंडरी फोन म्हणून वापरता यावा, यासाठी कंपनीने हा फोन पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
एचएमडी ग्लोबल ही फिनलँडची कंपनी हा फोन लाँच करणार असून नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नोकिया 6 हा फोन लाँच केला असून हा फोन अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता.
एचएमडी ग्लोबल आता मोबाईल वर्ल्ड काँग्रेस इव्हेंटमध्ये नोकिया 3310 सोबतच आणखी काही फोन लाँच करण्याची शक्यता आहे. नोकिया 3310 सोबत Nokia 3, Nokia 5 आणि Nokia 6 हे फोनही लाँच होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement