एक्स्प्लोर

निर्मला सीतारमण गुगल सर्चमध्ये अव्वल, गोव्यात सर्वाधिक सर्च

रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, निर्मला सीतारमण या गुगल इंडियावर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती ठरल्या.

मुंबई: देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांची नियुक्ती झाली आहे. इंदिरा गांधींनंतर देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर आहे आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, निर्मला सीतारमण या गुगल इंडियावर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती ठरल्या. कालच उत्तर कोरियानेही हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यामुळे उत्तर कोरिया आणि निर्मला सीतारमण हे सर्चमध्ये अव्वल होते. या चुरशीत निर्मला सीतारमण यांनीच बाजी मारली. देशाच्या नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची ओळख निर्मला सीतारमण यांचं नाव संरक्षण मंत्री म्हणून टीव्ही वाहिन्यांवर जसं जाहीर झालं, तसं गुगल सर्चकडे नेटीझन्सनी उड्या घेतल्या. सकाळी 9.30 वाजल्यापासून निर्मला सीतारमण यांना गुगलवर सर्च करण्यास सुरुवात झाली. त्यांच्यापाठोपाठ मग पियूष गोयल आणि अल्फोन्स कन्नाथम यांचा गुगल सर्चमध्ये नंबर लागला. महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारमण यांना गुगलवर सर्च करण्यात गोवा अव्वल होतं. तामिळनाडूत सर्च नाही निर्मला सीतारमण या मूळच्या तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या आहेत. बहुधा तामिळनाडूवासियांना त्यांच्याबद्दल माहिती असल्याने, त्यांनी गुगल सर्च करणं टाळलं असावं. त्यामुळे तामिळनाडूत निर्मला सीतारमण या गुगल सर्चमध्ये पिछाडीवर पडल्या. सर्वाधिक सर्च गोव्यात निर्मला सीतारमण यांच्याबाबत गुगल सर्च करण्यात गोवा अव्वल स्थानावर राहिला. गोव्यातील 100 लोकांनी त्यांच्याबाबत जाणण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ उत्तराखंड 55, हिमाचल प्रदेश 50 यांचा नंबर लागतो. टॉप 20 मध्ये मोदी कॅबिनेट गुगल इंडियावर रविवारी मोदी कॅबिनेट आणि मंत्री सर्वाधिक सर्च करण्यात आले. गुगल इंडियावर सर्च करण्यात आलेल्या टॉप 20 विषयांमध्ये 18 विषय हे मोदी कॅबिनेट आणि त्यासंबंधी होते. अन्य विषयांमध्ये उत्तर कोरिया आणि ब्रिक्स संमेलन यांचा समावेश होता. एका दिवसात लाखो फॉलोअर्स वाढले निर्मला सीतारमण या ट्विटरवर केवळ 487 जणांना फॉलो करतात. तर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या 15 लाख 38 हजार 550 इतकी पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे काल एकाच दिवसात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 1,40,730 ने वाढली. ट्विटरवर मोदी सरकारचा जलवा मंत्रिमंडळ फेरबदलानंतर ट्विटरवर मोदी सरकारचा जलवा पाहायला मिळाला. मोदी मंत्रिमंडळाबाबत रविवारी 22.7 हजार ट्विट करण्यात आले. यादरम्यान ##मंत्री_नहीं_पीएम_बदलो हा हॅशटॅगही ट्रेंण्ड झाला. हा हॅशटॅग 4897 लोकांनी ट्विट केला होता. संबंधित बातम्या देशाच्या नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची ओळख 1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात! केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली! 2019 साठी मोदींची नवी टीम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Embed widget