एक्स्प्लोर
आयफोन 7 सप्टेंबरमध्ये बाजारात?, फीचर्सनंतर आता नवी माहिती लीक
नवी दिल्लीः बहुप्रतिक्षीत आयफोन 7 सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार अशी माहिती आहे. मात्र त्याआधी या फोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. या फोनची रॅम, कॅमेरा आणि किंमत याबद्दलच्या विविध तर्क वितर्कांनी आयफोनप्रेमींमध्ये चांगलाच संभ्रम आहे.
आयफोनप्रेमींचा हा संभ्रम येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दर होण्याची शक्यता आहे. अॅपल आपले फोन सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लाँच करते. त्यामुळे अॅपल आयफोन बद्दल काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लाँचिंग 16 सप्टेंबरला?
आयफोनच्या फीचर्सप्रमाणेच लाँचिंगबाबतही अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र आयफोनबद्दल नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 12 सप्टेंबरला हा फोन लाँच होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. ट्विटरद्वारे अचूक लीक माहितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एव्हन ब्लासने ही माहिती दिली आहे.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस असे दोन व्हर्जन असणार आहेत. आयफोन 7 प्लसची रॅम तब्बल 256 जीबी असेल, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर लीक झालेल्या व्हिडिओद्वारे आयफोनचा जबरदस्त कॅमेरा पाहायला मिळाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement