भारतामध्ये ऑनलाईन स्ट्रिमिंग अॅप्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम यासारखे विविध पर्याय सध्या भारतीय युजर्सकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी नेटफ्लिक्सची भारतातील लोकप्रियता जास्त आहे. त्यामुळेच आगामी काळात नेटफ्लिक्सने तीन हजार कोटींची गुंतवणूक कऱण्याचा निर्णय घेतला आहे.
नेटफ्लिक्स आगामी काळात प्रादेशिक भाषांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. यापूर्वीच नेटफ्लिक्सने काही मराठी चित्रपट आणि वेबसिरीज उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, यापुढे नेटफ्लिक्स स्वतः चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहेत. नेटफ्लिक्सवरील कंटेन्ट तरुणाईमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
नेटफ्लिक्स झाले स्वस्त :
नेटफ्लिक्स या जगप्रसिद्ध ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील युजर्ससाठी सर्वात स्वस्त प्लान लाँच करण्यात आला आहे. हा प्लान मोबाईल युजर्ससाठी असून फक्त 250 रुपये किंमतीच्या या प्लानमध्ये महिनाभर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सचा हा नवीन प्लान केवळ मोबाईल आणि टॅब्लेट युजर्ससाठी आहे. 250 रुपयांच्या या प्लानमध्ये एचडी किंवा अल्ट्रा एचडी कंटेंट मिळणार नाही. तसेच एकावेळी एकाच डिव्हाईसवर नेटफ्लिक्स वापरता येणार आहे. नेटफ्लिक्सचा हा जगभरातला सध्याचा सर्वात स्वस्त प्लान आहे. आतापर्यंत नेटफ्लिक्सचे 500, 650 आणि 800 रुपये असे तीन वेगवेगळे प्लान होते.
नेटफ्लिक्स काय आहे
नेटफ्लिक्स ही अमेरिकेत 18 वर्षांपूर्वी लाँच झाली आहे. यावर कोणताही चित्रपट कधीही पाहता येऊ शकतो. नेटफ्लिक्स ही मीडिया स्ट्रिमिंग सर्व्हिस कंपनी आहे. नेटफ्लिक्समुळे तुम्हाला तुमच्या मागणीनुसार टेलिव्हिनज शो किंवा चित्रपट ऑनालाईन पाहता येणार आहे. या सुविधेसाठी तुम्हाला दरमहा ठराविक रुपये खर्च करावे लागतील. पण पहिल्या महिन्यासाठी नेटफ्लिक्सची सुविधा युजर्सला अगदी मोफत वापरता येणार आहे.
संबंधित बातम्या :
ट्रोलिंग? चालायचंच!, सेलिब्रिटींवरील टोमण्यांबद्दल श्रिया पिळगांवकरचं स्पष्ट मत
Netflix वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' उपकरणांवर सेवा होणार बंद