एक्स्प्लोर
बहुप्रतीक्षित ‘मोटो जी जेन 4’ स्मार्टफोन याच महिन्यात लॉन्च होणार?

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित मोटो जी (जेन 4) स्मार्टफोनचं याच महिन्यात लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. येत्या 17 मे रोजी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, येत्या 17 मे रोजी भारतात हा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याचं बोललं जात आहे. मोटोच्या भारतातील ट्विटर हँडलवरुन एक टीझर इमेजही रिलीज केलं आहे. यामध्ये #Missing हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. या टीझर इमेजच्या माध्यमातून कथित मोटो जी 4 स्मार्टफोनचेया फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. टीझरच्या माध्यमातून यूजर्सच्या समस्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, त्यावर उपाय म्हणजे ‘मोटो जी 4’ असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. व्हिडीओ गेम खेळताना हँडसेट हँग होणं किंवा स्मार्टफोनची बॅटरी अचानक कमी होणं, यांसारख्या समस्यांवर मोटो जी 4 हा स्मार्टफोन उपाय असल्याचं सांगितलं आहे. मात्र, स्मार्टफोनचे अधिकृत फीचर्स अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. दरम्यान, 28 एप्रिललाच मोटोच्या भारतीय विभागानं 17 मे रोजी होणाऱ्या मीडिया इव्हेंटची निमंत्रणं द्यायलाही सुरुवात केली आहे. निमंत्रण पत्रिकेवर इव्हेंटची तारिख सोडून इतर कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. ‘मोटी जी 3’प्रमाणेच ‘मोटी जी 4’ही सर्वात आधी भारतात लॉन्च केला जाईल, असं म्हटलं जात आहे.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















