News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

Moto E5, Moto E5 Plus लाँच, परवडणाऱ्या किमतीत भन्नाट फीचर्स

मोटोरोलाने मोटो सीरिजमधील आणखी दोन भन्नाट फोन लाँच केले आहेत. Moto E5 आणि Moto E5 Plus हे बजेट फोन भेटीला आले आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: मोटोरोलाने मोटो सीरिजमधील आणखी दोन भन्नाट फोन लाँच केले आहेत. Moto E5 आणि Moto E5 Plus हे बजेट फोन भेटीला आले आहेत. या फोनच्या किमती आणि अॅडव्हान्स फीचर्समुळे हे फोन नक्कीच ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास कंपनीला आहे. मोटो ई 5 ची किंमत 9 हजार 999 रुपये आहे, तर मोटो ई 5 प्लस 11 हजार 999 रुपयात मिळणार आहे. दोन्ही फोन केवळ अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध असतील. तसंच मोटोरोला रिटेल शॉपमध्ये  Moto E5 तर Moto E5 Plus हा फोन 600 पेक्षा जास्त मोटो हब स्टोअरमध्ये मिळणार आहे. अमेझॉन इंडियाने Moto E5 Plus साठी 11 आणि 12 जुलै या दोन दिवसांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर 800 रुपयांची सूट, एक्स्चेंज ऑफरमध्ये अतिरिक्त 1 हजार रुपये, रिलायन्स जिओच्या 198 आणि 298 रुपयांच्या प्लॅनवर 130GB जास्त डेटा, तसंच EMI साठी व्याज लागणार नाही, ही ऑफर दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने मोटो स्टोअरमधून खरेदी करणाऱ्यांसाठीही दोन्ही फोनवर विविध ऑफर दिल्या आहेत. यामध्ये पेटीएम मॉल्स क्यूआरकोडद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1200 रुपये कॅशबॅक, 130 GB जिओ डाटाचा समावेश आहे. बॅटरी Moto E5 Plus या स्मार्टफोनची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तब्बल 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी. ही बॅटरी तब्बल 18 तास चालेल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय Moto E5 या फोनची बॅटरीही तितकीच तगडी म्हणजेच 4000mAh क्षमतेची आहे. कंपनीने या मोबाईलसोबत 18W चा टर्बो चार्जर दिला आहे, ज्यामुळे 15 मिनिटात 6 तास चालेल इतकी बॅटरी चार्ज होणार आहे. फीचर्स - Moto E5 Plus 5000mAh क्षमतेची बॅटरी- 10 W रॅपिड चार्जिंग 15.21 CM (6 इंच) डिस्प्ले कॅमेरा - 12 मेगापिक्सल कॅमेरा, ऑटो फोकस आणि एलईडी फ्लॅशसह उपलब्ध फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल फ्लॅशची सुविधा ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॉईड 8.0 Oreo प्रोसेसर - 1.4GHz Snapdragon 430 Octa-core रॅम – 3GB स्टोरेज - 32 GB जी 128GB पर्यंत वाढवता येते. ड्युअल सिम स्लॉट (4G+4G) किंमत – 11,999 फीचर्स - Moto E5 5.7 इंच HD डिस्प्ले कॅमेरा – 13 MP आणि 5 MP फ्लॅशसह उपलब्ध. ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॉईड 8.0 Oreo बॅटरी - 4000mAh रॅम – 2GB स्टोरेज – 16GB किंमत - 9999 अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.
Published at : 11 Jul 2018 11:57 AM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

Ray-Ban Meta Glasses: AI ग्‍लासेस्, व्हिडीओ कॅप्‍चरची क्षमता, UPI सपोर्ट; Ray-Ban Meta चष्मा लॉन्च, किंमत किती?

Ray-Ban Meta Glasses: AI ग्‍लासेस्, व्हिडीओ कॅप्‍चरची क्षमता, UPI सपोर्ट; Ray-Ban Meta चष्मा लॉन्च, किंमत किती?

मोठी बातमी, आता व्हाटसॲप, टेलीग्राम, स्नॅपचॅटचा वापर करण्यासाठी सिम कार्ड आवश्यक,अन्यथा ॲप बंद होणार  केंद्रानं नवे नियम बनवले, अंमलबजावणी कधी? 

मोठी बातमी, आता व्हाटसॲप, टेलीग्राम, स्नॅपचॅटचा वापर करण्यासाठी सिम कार्ड आवश्यक,अन्यथा ॲप बंद होणार  केंद्रानं नवे नियम बनवले, अंमलबजावणी कधी? 

ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग

ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग

Most Common Passwords in India : तुम्ही मोबाईल अन् सोशल मीडियासाठी जो पासवर्ड वापरताय, तोच आणखी किती भारतीय वापरतायत?

Most Common Passwords in India : तुम्ही मोबाईल अन् सोशल मीडियासाठी जो पासवर्ड वापरताय, तोच आणखी किती भारतीय वापरतायत?

Google Chrome वापरताय, तर सावधान! सरकारने केला महत्वाचा अलर्ट जारी, वाचा सविस्तर

Google Chrome वापरताय, तर सावधान! सरकारने केला महत्वाचा अलर्ट जारी, वाचा सविस्तर

टॉप न्यूज़

अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!

IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!