एक्स्प्लोर

केंद्राकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी, आता इंटरनेट सर्वांसाठी समान!

आता मोबाईल ऑपरेटर्स, इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्या आणि सोशल मीडिया कंपन्या इंटरनेटवर कंटेंट आणि स्पीडबाबत पक्षपातपणा करु शकणार नाहीत.

नवी दिल्ली: दीर्घ चर्चा आणि वाद-विवादानंतर अखेर मोदी सरकारने नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर इंटरनेट दरांमध्ये कोणताही भेदभाव नसेल. त्यामुळे भारतात इंटरनेट ब्राऊजिंग किंवा सर्व प्रकारच्या डेटासाठी समान दर लागू असेल. म्हणजे इंटरनेट डेटा चार्जेस भरल्यानंतर, वेगवेगळ्या अॅपसाठी वेगवेगळे पॅक/रिचार्ज करण्याची गरज नसेल. जर टेलिकॉम कंपन्यांनी बदमाशी करत, नियमांचं उल्लंघन केलं, तर त्यांना मोठा दंड ठोठावण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. आता मोबाईल ऑपरेटर्स, इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्या आणि सोशल मीडिया कंपन्या इंटरनेटवर कंटेंट आणि स्पीडबाबत पक्षपातपणा करु शकणार नाहीत. शिवाय निवडक सेवा किंवा वेबसाईट फुकटात देण्याचाही निर्णय घेऊ शकणार नाहीत. टेलिकॉम सचिव अरुणा सुंदरराजन यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बुधवारी इंटर मिनिस्ट्रियल कमिशनची बैठक झाली. यामध्ये नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी देण्यात आली. ती तात्काळ लागूही झाली आहे.” सरकारच्या या निर्णयाचं नेटिझन्सकडून स्वागत करण्यात येत आहे. सरकारच्या या आदेशामुळे कोणतीही टेलिकॉम कंपनी एकाधिकार लागू करु शकणार नाही. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी सर्व प्रकारच्या डेटा-डाऊनलोडिंगचा दर्जा समान ठेवून सर्व प्रकारच्या डेटासाठी समान किंमत लागू करावी. कारण टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या डेटासाठी वेगवेगळी किंमत वसूल करण्याच्या प्रयत्नात होत्या. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या बागेत तुम्ही 100 रुपये भरुन प्रवेश केलात आणि त्यानंतर घसरगुंडीचे वेगळे पैसे, झोपाळा वापरण्याचे वेगळे पैसे, वेगात झोका घेण्याचे वेगळे पैसे आकारले तर तुम्हाला कसं वाटेल? तशाच प्रकारचे दर इंटरनेट कंपन्या आकारण्याच्या विचारात होत्या. म्हणजे तुम्ही इंटरनेट पॅक अॅक्टिव्ह करायचाच पण व्हॉट्सअॅपसाठी वेगळं, फेसबुकसाठी वेगळं किंवा अन्य अॅप्ससाठी वेगळं रिचार्ज असा इंटरनेट कंपन्यांचा डाव होता. पण आता केंद्र सरकारने हा डाव हाणून पाडला आहे. सध्या आपण इंटरनेट वापरतो, त्यासाठी अनेक कंपन्यांनी बरीच गुंतवणूक केली आहे. मात्र आता फेसबुक, गुगल इ. कंपन्या इतरांचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरुन नफा कमवत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून टेलिकॉम कंपन्यांना आपले दर हवे तसे, हवे तितके ठेवण्याची सवलत हवी आहे. तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाता त्यावर हा रेट ठरवण्याची मुभा हवी कंपन्यांना हवी. म्हणजे गुगल वापरायचं तर भरा 100 रुपये, फेसबुकचे 75 रुपये, यूट्यूबचे 150 रुपये असा दर लावण्यासारखं. हा वाढीव दर आकारण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला मोबाईलचा वापर फोन किंवा एसएमएस करण्यासाठी केला जात असे. मात्र व्हॉट्सअॅप, व्हायबर, हाईक सारखे अॅप्स आले त्यामुळे मेसेज आणि फोनचं प्रमाण घटलं. पर्यायाने टेलिकॉम कंपन्यांचा नफा घटला. त्यामुळे त्यांना इंटरनेटच्या नफ्यातील भागिदारी हवी आहे. इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या इंटरनेटच्या वापरावर फिल्टर बसवण्याच्या प्रयत्नात होत्या. म्हणजे प्रत्येक अ‍ॅपसाठी विशेष प्लॅन दिला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला वॉट्स अ‍ॅप, हाइकसाठी एक विशेष पॅकेज घ्यावे लागेल. तर यूट्यूबसारख्या साईट्सवर व्हिडीओ बघता यावा यासाठी तुम्हाला दुसरे पॅकेज निवडावे लागेल. तुम्हाला नेटवर सर्च करायचे असेल किंवा ईमेलची सुविधा हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागेल. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे आणि नेट न्यूट्रलिटीही धोक्यात येणार आहे. संबंधित बातम्या : नेट न्यूट्रलिटी म्हणजे नेमकं काय?   फेसबुकला 'ट्राय'चा दणका, 'फ्री बेसिक्स' नामंजूर, नेट न्यट्रॅलिटीचा विजय   'नेट न्यूट्रलिटी'चा मुद्दा तापला, काय परिणाम होणार तुमच्या इंटरनेटवर? 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget