एक्स्प्लोर
मित्रों को़ड वापरा, 100 टक्के कॅशबॅक मिळवा
मुंबई : प्रसिद्ध डिजिटल वॉलेट मोबिक्विकनं ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मित्रों या हाकेचा प्रोमोकोड मोबिक्विकनं जाहीर केला आहे. 'Mitron' कोडचा वापर करताच 100 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे. मात्र पंतप्रधान मोदी ज्यादिवशी आपल्या भाषणामध्ये 'मित्रों' हा शब्द वापरतील त्यादिवशीच हा कोड वापरता येईल.
नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर डिजिटल वॉलेटच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच मोबिक्विकची ही ऑफर सर्वांच लक्ष वेधत आहे. मोबिक्विकवरुन कोणताही व्यवहार केल्यास त्यावर 100 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. या ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त 100 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. कमीत कमी 10 रुपयांच्या रिचार्जसाठी हा कोड वापरता येईल.
मोबिक्विकची ही ऑफर 31 जानेवारी 2017 पर्यंत वैध असेल. तसंच एका नंबरवरुन हा कोड एकदाच वापरता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement