एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीत मारुतीच्या सियाज, अर्टिंगा कारच्या किंमतीत भरघोस कपात
नवी दिल्ली: देशातील नंबर 1 कंपनी मारुती सुझुकीनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. मारुती सुझुकीनं आपल्या सियाज आणि अर्टिगा एसएचव्हीएसच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे.
सियाज कार 69,000 स्वस्त झाली आहे तर अर्टिगाच्या किंमतीत 62,000ची कपात करण्यात आली आहे. अबकारी करामध्ये कपात करण्यात आल्यामुळे कारच्या किंमती एवढी मोठी घट झाली आहे.
या कारवर का मिळाली एवढी सूट?
मारुती सुझुकीच्या स्मार्ट हायब्रिड व्हीकल बाय व्हीकल जे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लानच्या अंतर्गत येत असल्यानं त्यांना अबकारी करामध्ये सूट मिळाली आहे. दिल्ली सरकारनं इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारच्या व्हॅटमध्ये कपात केल्यानं या कारवरील कर कमी झाले आहेत.
या कारवरील व्हॅट 24 टक्क्यांवरुन 12.5 टक्के करण्यात आला आहे. पण कारवरील ही कपात फक्त दिल्लीच्या ग्राहकांसाठी आहे. त्यामुळे देशातील इतर ठिकाणी याचे दर आहे त्या प्रमाणेच राहणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement