एक्स्प्लोर
झक्कास ऑफर... अवघ्या 999 रुपयांत सॉलिड स्मार्टफोन
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी LeEco 7 आणि 8 एप्रिलला LeEco दिवस साजरा करीत आहे. या दिवशी भारतात लाँच करण्यात आलेले दोन स्मार्टफोन Le 1s आणि Le मॅक्सवर जबरदस्त सूट मिळते आहे. फ्लिपकार्टवर या दोन्ही स्मार्टवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही मिळते आहे.
Le 1s स्मार्टफोन:
10,999 रु. किंमतीचा हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये अवघ्या 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. 999 रुपये आयफोन 5s आणि LeEco या फोनवर एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.
जर 999 रुपयात Le 1s खरेदी करायचा असल्यास त्यासाठी आयफोन 5S किंवा LeEcoवरच ऑफर मिळणार आहे.
या स्मार्टफोनसाठी सगळ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच एका लकी विजेत्याला महिंद्राची KUV100 कार जिंकण्याची संधी आहे.
Le मॅक्स स्मार्टफोन:
32,999 रु. किंमतीचा Le मॅक्स 11,998 रुपयात खरेदी करता येणार आहे. पण हा स्मार्टफोन तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणार आहे.
Le 1s स्मार्टफोन पूर्णपणे बॉडी मेटल असून त्याचा डिस्प्ले 5.5 इंच आहे. याचं रेझ्युलेशन 1920x1080 पिक्सल आहे. अँड्रॉईड 5.0 सपोर्ट आहे.
यामध्ये मीडियाटेक एक्सटेन टर्बो ऑक्टाकोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसंच यामध्ये 3 जीबी रॅम आहे. तसंच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 32 जीबी इनबिल्ट मेमरी असून 3000 mAh बॅटरी क्षमता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement